गृह मंत्रालय
नागरिकत्व(सुधारणा) नियम, 2024 अधिसूचित केल्यानंतर नागरिकत्व प्रमाणपत्रांचा पहिला संच जारी
केंद्रीय गृह सचिवांनी आज नवी दिल्लीत काही अर्जदारांना केली नागरिकत्व प्रमाणपत्रे प्रदान
Posted On:
15 MAY 2024 6:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 मे 2024
नागरिकत्व(सुधारणा) नियम, 2024 अधिसूचित केल्यानंतर नागरिकत्व प्रमाणपत्रांचा पहिला संच आज जारी करण्यात आला. केंद्रीय गृह सचिव अजयकुमार भल्ला यांनी आज नवी दिल्लीत काही अर्जदारांना नागरिकत्व प्रमाणपत्रे प्रदान केली. गृहसचिवांनी या अर्जदारांचे अभिनंदन केले आणि नागरिकत्व(सुधारणा) नियम, 2024ची ठळक वैशिष्ट्ये अधोरेखित केली. यावेळी झालेल्या संवाद सत्रामध्ये टपाल सचिव, संचालक(आयबी), भारताचे महानिबंधक आणि वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

भारत सरकारने 11 मार्च 2024 रोजी नागरिकत्व(सुधारणा) नियम, 2024 अधिसूचित केले होते. या नियमांमध्ये अर्जाचे स्वरुप, जिल्हा स्तरीय समितीला अर्जांची छाननी आणि त्यावर प्रक्रिया करण्याचे तंत्र आणि जिल्हा स्तरीय अधिकारप्राप्त समितीकडून(EC) नागरिकत्व बहाल करण्याचा समावेश आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून धर्माच्या आधारे होणाऱ्या छळामुळे किंवा अशा प्रकारच्या छळाच्या भीतीने भारतात 31.12.2024 पर्यंत प्रवेश केलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिस्ती समुदायाच्या व्यक्तींकडून या नियमांना अनुसरून अर्ज प्राप्त झाले आहेत.

नामनिर्देशित अधिकारी म्हणून वरिष्ठ टपाल अधीक्षक/ टपाल अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा स्तरीय समित्यांनी कागदपत्रांची यशस्वीरित्या पडताळणी केल्यावर अर्जदारांना निष्ठेची शपथ दिली. नियमांनुसार प्रक्रिया केल्यावर जिल्हा स्तरीय समित्यांनी हे अर्ज संचालक( जनगणना कार्य) यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा स्तरीय अधिकारप्राप्त समित्यांकडे पाठवले आहेत. या अर्जांवरील प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

संचालक( जनगणना कार्य), दिल्ली यांच्या नेतृत्वाखालील दिल्लीच्या अधिकारप्राप्त समितीने आवश्यक त्या छाननीनंतर 14 अर्जदारांना नागरिकत्व बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संचालक( जनगणना कार्य) यांनी या अर्जदारांना प्रमाणपत्रे प्रदान केली.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2020704)
Visitor Counter : 187
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam