भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांतील 96 लोकसभा मतदारसंघांमध्ये शांततेत मतदान


रात्री 8.00 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार 62.84% मतदान; पुढील अद्ययावत आकडेवारी रात्री 11.45 वाजता

आंध्र प्रदेश, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पूर्ण

श्रीनगरमध्ये अनेक दशकांनंतर सर्वाधिक मतदानाची नोंद

Posted On: 13 MAY 2024 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 मे 2024

लोकसभा निवडणूक 2024 च्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7.00 वाजता सुरुवात झाली. देशातील 96 मतदारसंघांमध्ये एकाच वेळी मतदान सुरू झाले आणि रात्री 8.00 वाजेपर्यंत सुमारे 62.84% मतदानाची नोंद झाली. मतदानाची वेळ  सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत होती  मात्र, मतदान केंद्रांबाहेर मोठ्या संख्येने मतदार रांगा लावून उभे होते.

मतदानाची आकडेवारी तात्पुरत्या स्वरुपात असून अद्ययावत आकडेवारी भारतीय निवडणूक आयोगाच्या वोटर टर्नआऊट ॲपवर उपलब्ध होईल. त्यामध्ये टप्पेनिहाय आकडेवारी, राज्य, लोकसभा मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ आदी निहाय आकडेवारीचा समावेश असेल.आयोगाच्या वतीने सर्व भागीदारांच्या सोयीसाठी मतदानाच्या अद्ययावत आकडेवारीचे प्रसिद्धीपत्रक 11.45 वाजता जारी करण्यात येणार आहे.

Sl. No.

State / UT

No. PCs

Approximate Voter Turnout %

1

Andhra Pradesh

25

68.12

2

Bihar

5

55.90

3

Jammu and Kashmir

1

36.58

4

Jharkhand

4

63.37

5

Madhya Pradesh

8

68.63

6

Maharashtra

11

52.75

7

Odisha

4

63.85

8

Telangana

17

61.39

9

Uttar Pradesh

13

57.88

10

West Bengal

8

75.94

Above 10 States/UTs (96 PCs)

96

62.84

 

निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या समाप्तीसह, सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा  निम्मा टप्पा पार झाला असून या टप्प्यात 23 राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि 379 लोकसभा मतदारसंघांमधील मतदान पूर्ण झाले आहे. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आंध्रप्रदेश  या राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका तसेच ओदिशा विधानसभेच्या 28 जागांसाठीचे मतदान पूर्ण झाले आहे.

मतदारांनी या मतदान प्रक्रियेत अत्यंत उत्साहाने भाग घेतला. जी 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले तेथे स्वच्छ सूर्यप्रकाश आणि ढगाळ हवामान अशा दोन्ही वातावरणात होत असलेल्या मतदानाची दृश्ये प्रसिद्ध झाली. या टप्प्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, बिहार,जम्मू आणि काश्मीर, झारखंड,ओदिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मतदान झाले. या टप्प्यात एकूण 1717 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

लोकसभा निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यात (पाचवा टप्पा) देशातील 8 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांतील 49 लोकसभा मतदारसंघांमध्ये 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे.

N.Chitale/R.Bedekar/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2020491) Visitor Counter : 258