भारतीय निवडणूक आयोग

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात रात्री 11:40 वाजेपर्यंत अंदाजे 64.4% मतदान

Posted On: 07 MAY 2024 11:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 मे 2024

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात रात्री 11:40 वाजेपर्यंत अंदाजे 64.4% मतदान झाले. मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांकडून उपलब्ध होत असलेल्या आकडेवारीच्या आधारावर क्षेत्रीय पातळीवरील अधिकारी ही आकडेवारी अद्ययावत करतील, आणि पीसीनुसार (संबंधित एसी विभागांसह) व्हीटीआर ॲपवर ही आकडेवारी थेट उपलब्ध होईल.निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात हीच प्रक्रिया अवलंबण्यात आली होती.

राज्यनिहाय अंदाजे मतदानाची आकडेवारी रात्री 11:40 वाजता पुढील प्रमाणे होती:

अनु क्र.

 

राज्य/केंद्रशासित प्रदेश

 

पीसी ची संख्या

 

अंदाजे मतदान %

 

1

आसाम

4

81.61

2

बिहार

5

58.18

3

छत्तीसगड

7

71.06

4

दादरा आणि नगरहवेली आणि दमण आणि दीव

2

69.87

5

गोवा

2

75.20

6

गुजरात

25

58.98

7

कर्नाटक

14

70.41

8

मध्यप्रदेश

9

66.05

9

महाराष्ट्र

11

61.44

10

उत्तरप्रदेश

10

57.34

11

पश्चिम बंगाल

4

75.79

11 राज्ये (93 पी सी)

 

93

64.40

वरील आकडेवारी क्षेत्रीय अधिकार्यांद्वारे प्रणालीवर नोंदवण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर जाहीर करण्यात आली आहे. ही अंदाज वर्तवण्याची  पद्धत आहे, कारण काही मतदान केंद्रांकडून आकडेवारी मिळायला वेळ लागतो. त्याचप्रमाणे या पद्धतीत पोस्टल बॅलेटचा (टपालाद्वारे मतदान) समावेश नाही. प्रत्येक पीएससाठी नोंदवलेल्या मतांचा अंतिम आकडा फॉर्म 17 सी मध्ये सर्व पोलिंग एजंट द्वारे मतदान संपल्यावर शेअर केला जातो.

S.Patil/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2019954) Visitor Counter : 48