संरक्षण मंत्रालय
भारतीय तटरक्षक दलाने केरळच्या किनारपट्टीजवळच्या समुद्रात गंभीर आजारी असलेल्या मच्छिमाराचे प्राण वाचवले
Posted On:
08 MAY 2024 1:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मे 2024
भारतीय तटरक्षक दलाने 07 मे 2024 रोजी केरळमधील बेपोरच्या किनारपट्टीजवळच्या समुद्रात सुमारे 40 सागरी मैलांवरील जझिरा या भारतीय मच्छीमार नौकेवरील गंभीर आजारी असलेल्या मच्छिमाराची सुटका केली. समुद्रात पडून वाहून जात असलेल्या या मच्छीमाराचे प्राण नौकेवरील खलाशांनी वाचवले होते, मात्र फुफ्फुसात जास्त पाणी गेल्याने त्याची प्रकृती खालावली.
मच्छिमार नौकेने वैद्यकीय मदतीसाठी दिलेल्या आपत्कालीन हाकेला भारतीय तटरक्षक दलाने प्रतिसाद दिला, आणि कोची येथून आर्यमन आणि C-404 जहाजे, तसेच वैद्यकीय पथकासह हलकी प्रगत हेलिकॉप्टर मदत कार्यासाठी रवाना केली. भारतीय तटरक्षक दलाच्या पथकाने या मच्छिमार नौकेचा शोध घेतला, आणि नौकेवरील रुग्णाला हवाई मार्गे कोची येथे नेले. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. भारतीय तटरक्षक दलाने ‘वयम् रक्षामा’ या आपल्या ब्रीदवाक्याला अनुसरून जलद आणि तत्परतेने समन्वय साधून, समुद्रामध्ये आणखी एकाचे प्राण वाचवले.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2019940)
Visitor Counter : 83