राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 20 APR 2024 7:52PM by PIB Mumbai

 

महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी दिलेल्या संदेशात म्हटले आहेः

महावीर जयंतीच्या या शुभ प्रसंगी मी सर्व देशवासियांना, विशेषतः जैन समुदायाच्या बांधवांना शुभेच्छा देत आहे.

महावीर जयंती हा भगवान महावीर यांचा जन्मदिवस अहिंसा आणि करुणा यांचे प्रतीक आहे. हा सण आपल्याला प्रेम आणि शांततेचा संदेश देतो. भगवान महावीर यांनी एका आदर्श आणि सुसंस्कृत समाजाच्या निर्मितीसाठी अहिंसा, ब्रह्मचर्य, सत्य आणि त्यागाचा मार्ग दाखवला. त्यांची शिकवण मानव जमातीच्या कल्याणासाठी नेहमीच संयुक्तिक राहील. 

या प्रसंगी आपण सर्वांनी समाजात प्रेम आणि सौहार्द पसरवण्याचा आणि देशाच्या विकासाकरिता समर्पित भावनेने काम करण्याचा संकल्प करुया”.

राष्ट्रपतींचा संदेश वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

***

M.Pange/S.Patil/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2018362) आगंतुक पटल : 142
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Kannada