राष्ट्रपती कार्यालय
चैत्र शुक्लादी, उगादी, गुढी पाडवा, चेट्टी चंद , नवरेह आणि साजीबू चेरोबा या सणांच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून देशवासियांना शुभेच्छा
Posted On:
08 APR 2024 5:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 एप्रिल 2024
चैत्र शुक्लादी, उगादी, गुढी पाडवा, चेट्टी चंद, नवरेह आणि साजीबू चेरोबा या सणांच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
शुभेच्छा संदेशात राष्ट्रपती म्हणतात, “चैत्र शुक्लादी, उगादी, गुढी पाडवा, चेट्टी चंद, नवरेह आणि साजीबू चेरोबा या सणांच्या पवित्र पर्वानिमित्त मी सर्व नागरिकांना शुभेच्छा देते.
या सणांच्या माध्यमातून वसंत ऋतूचे तसेच भारतीय नववर्षाचे स्वागत केले जाते.आपल्या देशाच्या विविध भागांमध्ये साजरे केले जाणारे हे उत्सव शांतता, सौहार्द आणि सहिष्णुतेचा संदेश देतात. हे सर्व सण आपल्या समृद्ध संस्कृती आणि वारशाचे प्रतीक आहेत. या पर्वांच्या माध्यमातून आपण निसर्गाप्रती आपली कृतज्ञता देखील व्यक्त करतो.
हे उत्सव सर्वांसाठी आनंद आणि संपन्नता घेऊन येवोत आणि आपल्या देशाच्या विकासासाठी अधिक उत्साहाने कार्य करण्याची प्रेरणा आपल्याला देवोत हीच सदिच्छा.
राष्ट्रपतींचा संदेश वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
N.Chitale/S.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2017444)
Visitor Counter : 111