माहिती आणि प्रसारण मंत्रालय
श्रीमती शेफाली शरण यांनी पत्रसूचना कार्यालयाच्या प्रधान महासंचालक म्हणून स्वीकारला पदभार
Posted On:
01 APR 2024 11:20AM by PIB Mumbai
प्नधान महासंचालक पदावरून काल श्री मनीष देसाई सेवानिवृत्त झाल्यानंतर श्रीमती शेफाली बी.शरण यांनी आज पत्र सूचना कार्यालयाच्या प्रधान महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. श्रीमती शरण या भारतीय माहिती सेवेच्या 1990 च्या तुकडीच्या अधिकारी आहेत.

तीन दशकांहून अधिक काळाच्या त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत, त्यांनी अर्थ, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय यासारख्या मंत्रालयांसाठी पत्रसूचना कार्यालय अधिकारी म्हणून माध्यम प्रसिद्धीचे कार्य (पोर्टफोलिओ) पाहिलेले आहे.
त्यांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्या म्हणूनही काम केले आहे.
या व्यतिरिक्त, त्यांनी केंद्रीय कर्मचारी योजना प्रतिनियुक्तीवर आरोग्य मंत्रालय (पारंपारिक प्रणाली / आयुष विभाग (2002-2007)) आणि अर्थ मंत्रालयात (आर्थिक व्यवहार विभाग 2013-2017) संचालक म्हणून अधिकारी पदावर काम केले आहे. OSD (माहिती धोरण ) माहिती आणि प्रसारण मंत्रालय, 2000-2002) तसेच 2007-2008 मध्ये लोकसभा दूरदर्शन (LSTV), लोकसभा सचिवालय येथे प्रशासन आणि वित्त संचालक म्हणून काम केले.
पदभार स्वीकारल्यानंतर श्रीमती शेफाली शरण यांचे पत्रसूचना कार्यालयातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी स्वागत केले.

***
NM/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2016789)
Visitor Counter : 177
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam