दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दूरसंचार विभागाची तोतयागिरी करणाऱ्या तसेच लोकांना मोबाईल नंबर वरील सेवा खंडित करण्याची धमकी देणाऱ्या कॉल्सविरूद्ध सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना


संचार साथी पोर्टलच्या ‘चक्षु-रिपोर्ट सस्पेक्टेड फ्रॉड कम्युनिकेशन्स’ या सुविधेवर अशा प्रकारच्या फसवणुकीची तक्रार करण्याचे नागरिकांना आवाहन

प्रविष्टि तिथि: 29 MAR 2024 1:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 29 मार्च 2024

ज्या नागरिकांना दूरसंचार विभागाच्या नावाने कॉल करून त्यांच्या सर्व मोबाईल नंबरच्या सेवा खंडित केल्या जातील अशी धमकी दिली जात आहे किंवा त्यांच्या मोबाईल नंबरचा काही बेकायदेशीर कामांमध्ये गैरवापर होत आहे, अशा नागरिकांसाठी दूरसंचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाने (DoT) मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दूरसंचार विभागाने (DoT) परदेशी मोबाइल नंबरवरून व्हॉट्सॲप कॉल्स द्वारे (जसे की +92-xxxxxxxxxx) सरकारी अधिकाऱ्यांची तोतयागिरी करून लोकांची फसवणूक करण्याच्या प्रकरणातही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

सायबर गुन्हेगार अशा कॉल्सद्वारे सायबर-गुन्हे अथवा आर्थिक फसवणूक करण्यासाठी वैयक्तिक माहितीची चोरी करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या वतीने असे कॉल करण्यासाठी कोणालाही अधिकृतरित्या नियुक्त केलेले नाही असे स्पष्टीकरण देत दूरसंचार विभागाने लोकांना सतर्क राहण्याचे तसेच असे कॉल आल्यावर नागरिकांनी कोणतीही माहिती सामायिक करू नये असे आवाहन केले आहे.

नागरिकांनी अशा फसवणुकीची तक्रार संचार साथी पोर्टलच्या ( www.sancharsaathi.gov.in ) ‘चक्षु-रिपोर्ट सस्पेक्टेड फ्रॉड कम्युनिकेशन्स’ सुविधेवर करण्याची सूचना दूरसंचार विभागाने दिली आहे.  नागरिकांनी नोंदवलेल्या अशा तक्रारी दूरसंचार संसाधनांचा सायबर-गुन्हेगारी, आर्थिक फसवणूक इत्यादींसाठी होणारा गैरवापर रोखण्यात दूरसंचार विभागाला मदत करतात.

याशिवाय, संचार साथी पोर्टलच्या ( www.sancharsaathi.gov.in ) सुविधेवर नागरिक त्यांच्या नावावर असलेले मोबाईल नंबर कनेक्शन तपासू शकतात आणि त्यांनी घेतलेले नाहीत किंवा त्यांच्यासाठी आवश्यक नाहीत अशा कोणतत्याही मोबाईल नंबर कनेक्शनबाबत हरकत नोंदवू शकतात.

सायबर-गुन्हेगारी किंवा आर्थिक फसवणुकीला आधीच बळी पडलेल्या नागरिकांनी सायबर-क्राइम हेल्पलाइन क्रमांक 1930 किंवा  www.cybercrime.gov.in वर तक्रार करण्याचा सल्ला दूरसंचार विभागाने दिला आहे.

S.Tupe/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2016639) आगंतुक पटल : 224
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil