माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकारने पत्रसूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेक युनिटला माहिती तंत्रज्ञान नियम 2021 अंतर्गत केले अधिसूचित

Posted On: 20 MAR 2024 10:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 20 मार्च 2024

केंद्र सरकारने, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील  पत्रसूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेक युनिटला केंद्र सरकारचे फॅक्ट चेक युनिट म्हणून अधिसूचित केले आहे.

आज जारी करण्यात आलेल्या राजपत्रित अधिसूचनेद्वारे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने, पीआयबी फॅक्ट चेक युनिटला, माहिती तंत्रज्ञान ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल मिडिया आचार संहिता) नियम 2021 च्या तरतुदी अंतर्गत, उपनियम (1) च्या उपकलम (5)  नुसार अधिसूचित केले आहे. माहिती प्रसारण मंत्रालय आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या विषयावर समन्वय राखून काम करत, बनावट वृत्त, विशेषतः समाजमाध्यमावर खोट्या बातम्या प्रसारित करण्यावर आळा घातला आहे.

नोव्हेंबर 2019 साली, पत्रसूचना कार्यालया अंतर्गत या फॅक्ट चेक म्हणजेच वस्तुस्थिती-तपासणी युनिटची स्थापना करण्यात आली होती, त्याचा उद्देश, बनावट वृत्त आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्यांना आळा घालणे हा होता.  केंद्र सरकारशी संबंधित अशा संशयित आणि शंका उपस्थित करता येण्यासारख्या बातम्या किंवा माहितीविषयी तक्रार करण्याचे मार्गही या युनिटने उपलब्ध करून दिले आहेत.

केंद्र सरकारची धोरणे, उपक्रम आणि योजना यांच्याबद्दल दिशाभूल करणारी, चुकीची माहिती दिली असल्यास त्याचा स्वयंस्फूर्तीने अथवा एखाद्या तक्रारीचा संदर्भ घेऊन प्रतिवाद आणि खंडन करण्याची जबाबदारी या युनिटवर सोपवण्यात आली आहे. हे युनिट, दिशाभूल करणाऱ्या माहितीवर लक्ष ठेवून, ती डीलीट करण्याचे तसेच चुकीच्या माहितीचा प्रतिवाद करण्याचे काम सक्रियपणे करत असते, जेणेकरून, सरकारबद्दल पसरवली जाणारी चुकीची माहिती ताबडतोब लोकांना कळावी आणि त्यात दुरुस्ती करून, सत्य स्थिती लोकांसमोर मांडता यावी.

नागरिक, विविध माध्यमांद्वारे, पीआयबी फॅक्ट चेक युनिट पर्यंत पोहचू शकतात. यात व्हॉट्स अॅप क्रमांक  (+918799711259), ईमेल (pibfactcheck[at]gmail[dot]com), एक्स (ट्वीटर) (@PIBFactCheck) आणि पीआयबी चे संकेतस्थळ अशा दुव्याचा समावेश आहे. (https://factcheck.pib.gov.in/). ज्या लोकांना संशयित मेसेज पुढे तपासासाठी अग्रेषित करायचा आहे, त्यांच्यासाठी, फॅक्ट चेक युनिटचा व्हॉटसअॅप हॉटलाईन नंबर सहज उपलब्ध आहे.

दिव्यांग व्यक्तींना देखील फॅक्ट चेक करता यावी, यासाठी या युनिटने उपाययोजना केल्या आहेत. इमेज (प्रतिमा/फोटो) हा सोशल मीडियातील एक महत्वाचा घटक असल्याने, मजकूर सर्वत्र पोहोचण्यासाठी, अल्टरनेट टेक्स्ट म्हणजेच  'पर्यायी मजकूर' (ए. एल. टी.) तयार करणे अधिकाधिक आवश्यक ठरले आहे. त्यानुसार, पीआयबी फॅक्ट चेक युनिटही आपल्या ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम हँडलवर प्रसारित केलेल्या सर्व पोस्टसह पर्यायी मजकूर उपलब्ध करुन देते.

S.Patil/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2015821) Visitor Counter : 148