राष्ट्रपती कार्यालय

प्रसिद्धी पत्रक

Posted On: 19 MAR 2024 10:53AM by PIB Mumbai

डॉ.तमिलसाई सुंदरराजन यांनी सादर केलेला तेलंगणाच्या राज्यपालपदाचा तसेच पुदुचेरीच्या नायब राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे.
यासंदर्भात नियमित स्वरुपाची व्यवस्था होईपर्यंत राष्ट्रपतींनी झारखंडचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीसोबतच तेलंगणाच्या राज्यपालपदाचा तसेच पुदुचेरीच्या नायब राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार देखील सोपवला आहे.
सी.पी.राधाकृष्णन यांनी नव्या जबाबदारीची सूत्रे स्वीकारल्याच्या तारखेपासून उपरोल्लेखित नियुक्ती लागू होणार आहे.

***

 JPS/SC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2015484) Visitor Counter : 56