भारतीय निवडणूक आयोग

महाराष्ट्र, बिहार, हरयाणा, गुजरात, झारखंड, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील 26 विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीचे वेळापत्रक

Posted On: 16 MAR 2024 5:52PM by PIB Mumbai

 

लोकसभा 2024 या सार्वत्रिक निवडणुकीसोबत खालील रिक्त असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहेः

अनुक्रमांक

राज्याचे नाव

विधानसभा मतदारसंघ क्र. आणि नाव

जागा रिक्त होण्याचे कारण

1.    

बिहार

195-अगियाओ (SC)

श्री. मनोज मंजिल अपात्र ठरल्यामुळे

2.    

गुजरात

26 - विजापूर

डॉ. सी. जे. चावडा यांचा राजीनामा

3.    

108 - खंबात

श्री. चिरागकुमार अरविंदभाई पटेल यांचा राजीनामा

4.    

136 - वाघोडिया

श्री. धर्मेंद्रसिंह राणुभा वाघेला यांचा राजीनामा

5.    

85 - मानवदार

श्री. अरविंदभाई जिनाभाई लदानी यांचा राजीनामा

6.    

83 - पोरबंदर

श्री. अर्जुनभाई देवाभाई मोढवाडिया यांचा राजीनामा

7.    

हरयाणा

21-कर्नाल

श्री. मनोहर लाल यांचा राजीनामा

8.    

झारखंड

31- गंदेय

डॉ. सर्फराझ अहमद यांचा राजीनामा

9.    

महाराष्ट्र

30 – अकोला पश्चिम

गोवर्धन मांगीलाल शर्मा ऊर्फ लालाजी यांचे निधन

10.                      

त्रिपुरा

 

7- रामनगर

सूरजीत दत्ता यांचे निधन

11.                      

 

 

उत्तर प्रदेश

 

 

136 - दादरौल

मानवेंद्र सिंह यांचे निधन

12.                      

173- लखनौ पूर्व

आशुतोष टंडन 'गोपालजी' यांचे निधन

13.                      

292 - गैनसारी

डॉ. शिव प्रताप यादव यांचे निधन

14.                      

403 – दुध्धी (ST)

श्री. राम दुलार अपात्र ठरल्यामुळे

15.                      

पश्चिम बंगाल

 

62-भगवानगोला

इद्रीस अली यांचे निधन

16.                      

113 - बारानगर

श्री. तापस रॉय यांचा राजीनामा

17.                      

तेलंगणा

71- सिकंदराबाद कॅन्ट. (SC)

लस्य नंदिता सायन्ना यांचे निधन

18.                      

 

 

 

 

हिमाचल प्रदेश

18 - धरमशाला

श्री. सुधीर शर्मा अपात्र ठरल्यामुळे

19.                      

21 – लाहौल आणि स्फिती(ST)

श्री. रवी ठाकूर अपात्र ठरल्यामुळे

20.                      

37 - सुजानपूर

श्री. राजिंदर राणा अपात्र ठरल्या मुळे

21.                      

39 - बरसार

श्री. इंदर दत्त लखनपाल अपात्र ठरल्यामुळे

22.                      

42 - गगरेत

श्री. चैतन्य शर्मा अपात्र ठरल्यामुळे

23.                      

45 – कुटलेहार

श्री. देविंदर कुमार (भुट्टो) अपात्र ठरल्यामुळे

24.                      

राजस्थान

165 – बागिदोरा (ST)

श्री. महेंद्र जीत सिंह मालवीय यांचा राजीनामा

25.                      

कर्नाटक

36 – शोरापूर (ST)

 राजा व्यंकटप्पा नाईक यांचे निधन

26.                      

तमिळनाडू

233 – विलावनकोडे

एस. विजयादारानी यांचा राजीनामा

 पोटनिवडणुकांचे वेळापत्रक परिशिष्ट-I ला जोडलेले आहे.

1.   मतदार यादी

निर्दोष आणि अद्ययावत मतदार यादी मुक्त, न्याय्य आणि विश्वासार्ह निवडणुकांचा पाया असल्याचा निवडणूक आयोगाचा ठाम विश्वास आहे. म्हणूनच तिचा दर्जा, स्वास्थ्य आणि निष्ठा सुधारण्यावर अतिशय मोठ्या प्रमाणावर आणि सातत्याने भर देण्यात आला आहे. निवडणूक कायदे (सुधारणा) कायदा-2021 द्वारे लोकप्रतिनिधी कायदा-1950 च्या 14 व्या कलमात सुधारणा केल्यावर एका वर्षात मतदार म्हणून नावनोंदणी करण्यासाठी पात्र असलेल्यांसाठी चार तारखांची तरतूद आहे. त्यानुसार आयोगाने 1 जानेवारी 2024 ही पात्रता तारीख म्हणून संदर्भ घेत मतदार यादी विशेष सारांश सुधारणा केली. यासाठी 1 जानेवारी 2024 च्या संदर्भाने पात्र नागरिकांकडून मतदार यादीत नोंदणी करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले. 1 जानेवारी 2024 च्या संदर्भाने विशेष मतदार यादी सारांश सुधारणेची कालबद्ध पूर्तता झाल्यानंतर खालीलप्रमाणे मतदार यादीचे अंतिम प्रकाशन करण्यात आले –

i. गुजरात, हिमाचल प्रदेश आणि त्रिपुरासाठी 5 जानेवारी 2024

ii. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि तामिळनाडूसाठी 22 जानेवारी 2024 

iii. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासाठी 23 जानेवारी 2024, आणि

iv. तेलंगणा आणि राजस्थानसाठी 8 फेब्रुवारी 2024

मात्र पात्रता तारखेच्या अनुषंगाने, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत मतदार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू राहील.

2. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅट

पोटनिवडणुकीसाठी सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीचा वापर करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. आयोगाने पुरेशा प्रमाणात ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी उपलब्ध करून दिली आहेत आणि या यंत्रांच्या साहाय्याने मतदान सुरळीतपणे व्हावे यासाठी सर्व पावले उचलली आहेत.

3. मतदारांची ओळख

निवडणूक छायाचित्र ओळख कार्ड (ईपीआयसी) हा मतदाराची ओळख पटवणारा मुख्य दस्तावेज असेल. त्याशिवाय खालीलपैकी कोणतेही ओळखपत्र मतदान केंद्रावर दाखवता येईल:

i.        आधार कार्ड,

ii.       मनरेगा जॉब कार्ड,

iii.       बँक/पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असणारे पासबुक,

iv.       कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत आरोग्य विमा स्मार्ट कार्ड,

v.       वाहनचालक परवाना,

vi.       पॅन कार्ड,

vii.      एनपीआर अंतर्गत आरजीआयद्वारे जारी केलेले स्मार्ट कार्ड,

viii.     भारतीय पारपत्र,

ix.       छायाचित्र असणारे सेवानिवृत्तीचे दस्तावेज,

x.       केंद्र/राज्य सरकार/ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या (पीएसयू)/खाजगी मर्यादित कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली छायाचित्र असलेली सेवा ओळखपत्रे, आणि

xi.       संसद सदस्य / विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांना दिलेली अधिकृत ओळखपत्रे.

xii.      युनिक डिसॅबिलिटी आयडी (युडिड) कार्ड, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, केंद्र सरकार

4. आदर्श आचारसंहिता

2 जानेवारी 2024 रोजी आयोगाने जारी केलेल्या पत्र क्रमांक 437/6/1NST/ECI/FUNCT/MCC/2024/ (पोटनिवडणुका) नुसार (हे आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे) ज्या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे, तो ज्या जिल्ह्याचा भाग असेल, त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये (जिल्ह्यांमध्ये) किंवा त्या जिल्ह्याच्या निवडणूक होत असलेल्या कुठल्याही भागात तत्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू होईल.

5. गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत माहिती

गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी प्रचाराच्या कालावधीत तीन वेळा या संदर्भातील माहिती वर्तमानपत्रात आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांद्वारे प्रकाशित करणे आवश्यक आहे. गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेले उमेदवार उभे करणाऱ्या राजकीय पक्षाने त्यांच्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती त्यांच्या संकेतस्थळावर तसेच वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर तीन वेळा प्रकाशित करणे आवश्यक आहे.

आयोगाने दिनांक 16 सप्टेंबर 2020  रोजीच्या आपल्या पत्र क्रमांक 3/4/2019/SDR/खंड.IV द्वारे असे निर्देश दिले आहेत की निर्दिष्ट कालावधी पुढील प्रमाणे तीन ब्लॉक मध्ये (कालखंड) निश्चित केला जाईल, जेणेकरून अशा उमेदवारांची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी मतदारांना पुरेसा वेळ मिळेल:

i.        अर्ज मागे घेतल्यानंतरच्या सुरूवातीच्या चार दिवसांमध्ये

ii.       पुढच्या 5व्या ते 8व्या दिवसात

iii.       9 व्या दिवसापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत (मतदानाच्या तारखेच्या आधीचा दुसरा दिवस)

(स्पष्टीकरण: अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीखही त्या महिन्याची 10 तारीख असेल आणि मतदान महिन्याच्या 24 तारखेला असेल तर घोषणेच्या प्रकाशनासाठीचा पहिला ब्लॉक महिन्याच्या 11 आणि 14 तारखेदरम्यान, तर दुसरा आणि तिसरा ब्लॉक त्या महिन्याच्या अनुक्रमे 15 ते 18 आणि 19 ते 22 तारखेदरम्यान असेल.)

ही अट रिट याचिका क्र. (सी) 2015/784   (लोक प्रहारी वि. युनियन ऑफ इंडिया आणि इतर) आणि  रिट याचिका (नागरी) क्र. 2011/536 (पब्लिक इंटरेस्ट फाउंडेशन अँड अदर्स वि. युनियन ऑफ इंडिया आणि इतर) प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने आहे.

ही माहिती ‘नो युअर कॅंडिडेट (आपल्या उमेदवाराबद्दल जाणून घ्या)’ या शीर्षकाच्या ॲपवरही उपलब्ध असेल. 

6. पोटनिवडणुकीदरम्यान कोविड (COVID) संबंधित व्यवस्था

आयोगाने सार्वत्रिक निवडणूक आणि पोटनिवडणुका आयोजित करताना अनुसरण्याची कोविड विषयक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, ती आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

***

M.Pange/S.Patil/P.Jambhekar/R.Agashe/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2015243) Visitor Counter : 107