भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांनी निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला

Posted On: 15 MAR 2024 3:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 मार्च 2024

 

भारत निवडणूक आयोगामध्ये निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार आणि डॉ सुखबीर सिंह संधू यांनी आज पदभार स्वीकारला.

पुढचे बारा आठवडे सुरु राहणारा निवडणुकीचा  भरगच्च  कार्यक्रम आणि कार्यवाहीच्या पार्श्वभूमीवर,  निर्वाचन  सदन येथे  मुख्य निवडणूक आयुक्त  राजीव कुमार यांनी नवनियुक्त निवडणूक आयुक्तांचे स्वागत केले. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी  भारत निवडणूक आयोगाचा चमू सज्ज असताना या ऐतिहासिक टप्प्यावर हे दोन निवडणूक आयुक्त यामध्ये सहभागी होत असल्याच्या  महत्त्वावर त्यांनी भर दिला.

निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसंबंधीची अधिसूचना 14 मार्च 2024 रोजी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली.  ज्ञानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंह  संधू हे अनुक्रमे केरळ आणि उत्तराखंड केडरचे भारतीय प्रशासकीय सेवेच्या 1988 तुकडीचे अधिकारी आहेत.

  

 

* * *

S.Kane/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2014921) Visitor Counter : 134