मंत्रिमंडळ
अन्न सुरक्षा क्षेत्रातील सहकार्याबाबत भारत आणि भूतान यांच्यातील करारावर स्वाक्षरी करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
प्रविष्टि तिथि:
13 MAR 2024 4:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मार्च 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज अन्न सुरक्षेच्या क्षेत्रातील सहकार्याबाबत भूतान रॉयल सरकारच्या आरोग्य विभागा अंतर्गत असलेल्या अन्न आणि औषध प्राधिकरण (बीएफडीए) आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) यांच्यातील करारावर स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली.
भूतान रॉयल सरकारच्या आरोग्य विभागा अंतर्गत असलेल्या अन्न आणि औषध प्राधिकरण (बीएफडीए) आणि भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया अंतर्गत असलेल्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) यांच्यातील करार दोन शेजारी देशांमधील व्यापार सुलभ करेल. या करारा अंतर्गत भारतात उत्पादने निर्यात करताना,एफएसएसएआयने विहित केलेल्या आवश्यकतांचे पालन केल्याचा पुरावा म्हणून बीएफडीए आरोग्य प्रमाणपत्र जारी करेल. यामुळे व्यवसाय सुलभतेला चालना मिळेल आणि दोन्ही बाजूंनी अनुपालन खर्च कमी होईल.
* * *
S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2014200)
आगंतुक पटल : 151
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam