पंतप्रधान कार्यालय
रेल्वेच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रमामध्ये दूरदृश्य प्रणालीव्दारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Posted On:
26 FEB 2024 2:35PM by PIB Mumbai
नमस्कार! आजचा हा कार्यक्रम म्हणजे, नवीन भारताच्या नव्या प्रकारच्या कार्य संस्कृतीचे प्रतीक आहे. आज जे काम भारत करीत आहे, ते अभूतपूर्व वेगाने करीत आहे. आज भारत जे काही करतो, त्याचे प्रमाणही अभूतपूर्व असते. आजच्या भारताने लहान-सहान स्वप्ने पाहणे कधीच सोडून दिले आहे. आम्ही मोठी- भव्य स्वप्ने पाहतो आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी रात्रं- दिवस काम करतो. हाच संकल्प या विकसित भारत- विकसित रेल्वे कार्यक्रमामध्ये दिसून येत आहे. या कार्यक्रमामध्ये देशभरातून सहभागी झालेल्या सर्व मंडळीचे मी अभिनंदन करतो. आपल्या बरोबर देशभरातील 500 पेक्षा अधिक रेल्वे स्थानके आणि दीड हजारांपेक्षा जास्त इतर स्थानांवरून लक्षावधी लोक जोडले गेले आहेत. वेगवेगळ्या राज्यांचे माननीय राज्यपाल, सर्व मुख्यमंत्री, केंद्र आणि राज्य सरकारांचे मंत्री, खासदार, आमदार मंडळी, आणि स्थानिक लोक प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, ज्यांना पद्म पुरस्कार मिळाला आहे, अशी वरिष्ठ मंडळी, भारताचे महत्वपूर्ण लोक, आपल्या आयुष्याची उमेदीची वर्ष, तरूणपणाचा काळ देशासाठी खर्च करणारे आमचे स्वातंत्र्य सेनानी आणि आपली भावी पिढी, युवा सहकारी आज आपल्याबरोबर आहेत.
तुम्हां सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज रेल्वेशी संबंधित 2000 पेक्षा अधिक प्रकल्पांचा शिलान्यास आणि लोकार्पण कार्यक्रम एकाचवेळी झाला आहे. आता तर या सरकारच्या तिस-या कार्यकाळाला जून महिन्यापासून प्रारंभ होणार आहे. आत्ता ज्या प्रमाणामध्ये काम केले जात आहे, ज्या वेगाने काम केले जात आहे, त्याचे सर्वांनाच खूप नवल वाटते. काही दिवसांपूर्वी मी जम्मू इथून एकाच वेळी आयआयटी- आयआयएम यासारख्या डझनभर मोठ्या शिक्षण संस्थांचे लोकार्पण केले. कालच मी राजकोट इथून एकाचवेळी पाच एम्स आणि अनेक वैद्यकीय संस्थांचे लोकार्पण केले. आणि आता आजचा हा कार्यक्रम आहे. आज 27 राज्यांमधील जवळपास 300 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये 550 पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांचा कायाकल्प करण्यासाठी शिलान्यास झाला आहे. आज उत्तर प्रदेशमधील ज्या गोमतीनगर रेल्वे स्थानकाचे लोकार्पण झाले आहे, त्या स्थानकाचे रूप खरोखरीच अतिशय देखणे दिसत आहे. याशिवाय 1500 पेक्षा जास्त रस्ते, उन्नत पूल, दुस-या पुलांच्या खालून जाणारे मार्ग, अशा योजनांचा आज सुरू झालेल्या कामांमध्ये समावेश आहे. 40 हजार कोटी रूपयांच्या या प्रकल्पांची कामे एकाच वेळी केली जाणार आहेत. काही महिन्यांपूर्वी आम्ही अमृत भारत स्थानक योजनेचा प्रारंभ केला होता. त्यावेळीही 500 पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणाच्या कामांना प्रारंभ केला गेला. आता हा कार्यक्रम आणखी पुढे नेला जात आहे. भारताच्या प्रगतीची रेलगाडी किती वेगाने धावते आहे, पुढे जात आहे, हे यावरून दिसून येते. या कामांबद्दल देशातील विविध राज्यांना, तिथल्या माझ्या सर्व नागरिक बंधू- भगिनींना मी अनेक- अनेक शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
आज विशेषत्वाने आपल्या युवावर्गातील मित्रांचे मी खूप -खूप अभिनंदन करतो. मोदी ज्यावेळी विकसित भारताविषयी बोलत असतात, त्यावेळी या सर्व गोष्टींचे सूत्रधार, केंद्रबिंदू आणि सर्वात मोठा लाभार्थी समूह - देशाची युवा पिढी आहे. आज या प्रकल्पांमुळे देशातील लाखों नवयुवकांना रोजगार आणि स्वरोजगारांच्या नवीन संधी मिळतील. आज रेल्वेचा जो कायाकल्प होत आहे, त्याचा लाभ जे आत्ता शाळा- महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत, त्यांना भरपूर होणार आहे. तसेच जे आज 30 ते 35 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहेत, त्यांनाही या प्रकल्पांचा खूप चांगला लाभ घेता येणार आहे. विकसित भारत, युवकांच्या स्वप्नातला भारत आहे. म्हणूनच विकसित भारत कसा असावा, हे निश्चित करण्याचा सर्वात जास्त अधिकारही त्यांनाच आहे. देशभरातील हजारो विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून विकसित भारतातील रेल्वेचे स्वप्न सर्वांसमोर मांडले, याचा मला आनंद वाटतो. यापैकी अनेक युवा मित्रांना त्याबद्दल पुरस्कारही मिळाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. देशाच्या प्रत्येक युवकाला मी सांगू इच्छितो की, तुमची स्वप्ने हाच मोदींचा संकल्प आहे. तुमचे स्वप्न, तुमचे परिश्रम आणि मोदींचा संकल्प, हीच विकसित भारताची हमी आहे.
मित्रांनो,
देशातील ही जी, अमृत भारत स्थानके आहेत, ती वारसा आणि विकास अशा दोन्ही गोष्टींचे प्रतीक असतील, याचा मला आनंद वाटतो. ओडिशाच्या बालेश्वर रेल्वे स्थानकाचे डिझाइन भगवान जगन्नाथ मंदिराच्या संकल्पनेवरून तयार केले आहे. सिक्कीमच्या रंगपो रेल्वे स्थानकावर तुम्हा लोकांना तिथल्या स्थानिक वास्तूकलेचा प्रभाव दिसून येईल. तर राजस्थानमधील सांगनेर रेल्वे स्थानकावर सोळाव्या शतकामध्ये हाताने केलेल्या छपाई कलेचा नमूना दिसून येईल. तामिळनाडूतील कुंभकोणम स्थानकाचे डिझाइन चोल काळातील वास्तूकलेवर आधारित आहे. अहमदाबाद रेल्वे स्थानकाचे डिझाइन मोढेरा सूर्य मंदिराच्या संकल्पनेवरून प्रेरणा घेवून तयार केले आहे. गुजरातमधल्या व्दारकेचे रेल्वे स्थानक व्दारकाधीश मंदिराच्या संकल्पनेनुसार बनवण्यात आले आहे. आयटी शहर गुरूग्रामचे रेल्वे स्थानक आयटीसाठीच समर्पित असेल. याचा अर्थ अमृत भारत स्थानके, त्या त्या शहरांचे वैशिष्ट्य काय आहे, याचा परिचय देतील. या स्थानकांची निर्मिती करतानाच दिव्यांग आणि वयोवृद्ध व्यक्ती, यांचा विचार करून, त्यांना सुविधा व्हावी, याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
मित्रांनो,
गेल्या 10 वर्षांमध्ये आपण सर्वांनी एक नवीन भारत बनवला जात आहे, हे पाहिले आहे. आणि रेल्वेमध्ये तर जे परिवर्तन घडून आले आहे, ते तुम्ही सर्वजण प्रत्यक्ष पहात आहातच. अशा सुविधा मिळाव्यात, याची कल्पना आपल्या देशातील लोक करीत होते. लोकांना वाटायचे, अशा सुविधा भारतातील रेल्वे प्रवाशांना मिळाल्या तर किती चांगले होईल... आता मात्र तुमच्यासाठी अशा सर्व सुविधा आम्ही केल्या आहेत, हे पाहत आहात. तुम्ही कधी काळी कल्पनेमध्ये विचार करीत होता, त्या सुविधा आता आम्ही प्रत्यक्षात केल्या आहेत, हे तुम्हाला दिसून येईल. एक दशकापूर्वीपर्यंत, देशात वंदे भारतसारखी आधुनिक, सेमी -हायस्पीड ट्रेन धावेल, याविषयी कधी विचार केला होता का, याविषयी कुणी काही ऐकले तरी होते का? कोणत्या तरी सरकारने अशा आधुनिक गाडीविषयी चर्चा केली होती का? एक दशकापूर्वी तर अमृत भारतसारख्या आधुनिक रेल्वेविषयी कल्पना करणेही खूप अवघड होते. एक दशकापूर्वी नमो भारतसारख्या शानदार रेल्वे सेवेविषयी कुणीही कधीही विचार केला नव्हता.
हा कार्यक्रम म्हणजे, नवीन भारताच्या नव्या प्रकारच्या कार्य संस्कृतीचे प्रतीक आहे. आज जे काम भारत करीत आहे, ते अभूतपूर्व वेगाने करीत आहे. आज भारत जे काही करतो, त्याचे प्रमाणही अभूतपूर्व असते. आजच्या भारताने लहान-सहान स्वप्ने पाहणे कधीच सोडून दिले आहे. आम्ही मोठी- भव्य स्वप्ने पाहतो आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी रात्रं- दिवस काम करतो. हाच संकल्प या विकसित भारत- विकसित रेल्वे कार्यक्रमामध्ये दिसून येत आहे. या कार्यक्रमामध्ये देशभरातून सहभागी झालेल्या सर्व मंडळीचे मी अभिनंदन करतो. आपल्या बरोबर देशभरातील 500 पेक्षा अधिक रेल्वे स्थानके आणि दीड हजारांपेक्षा जास्त इतर स्थानांवरून लक्षावधी लोक जोडले गेले आहेत. वेगवेगळ्या राज्यांचे माननीय राज्यपाल, सर्व मुख्यमंत्री, केंद्र आणि राज्य सरकारांचे मंत्री, खासदार, आमदार मंडळी, आणि स्थानिक लोक प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, ज्यांना पद्म पुरस्कार मिळाला आहे, अशी वरिष्ठ मंडळी, भारताचे महत्वपूर्ण लोक, आपल्या आयुष्याची उमेदीची वर्ष, तरूणपणाचा काळ देशासाठी खर्च करणारे आमचे स्वातंत्र्य सेनानी आणि आपली भावी पिढी, युवा सहकारी आज आपल्याबरोबर आहेत.
तुम्हां सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज रेल्वेशी संबंधित 2000 पेक्षा अधिक प्रकल्पांचा शिलान्यास आणि लोकार्पण कार्यक्रम एकाचवेळी झाला आहे. आता तर या सरकारच्या तिस-या कार्यकाळाला जून महिन्यापासून प्रारंभ होणार आहे. आत्ता ज्या प्रमाणामध्ये काम केले जात आहे, ज्या वेगाने काम केले जात आहे, त्याचे सर्वांनाच खूप नवल वाटते. काही दिवसांपूर्वी मी जम्मू इथून एकाच वेळी आयआयटी- आयआयएम यासारख्या डझनभर मोठ्या शिक्षण संस्थांचे लोकार्पण केले. कालच मी राजकोट इथून एकाचवेळी पाच एम्स आणि अनेक वैद्यकीय संस्थांचे लोकार्पण केले. आणि आता आजचा हा कार्यक्रम आहे. आज 27 राज्यांमधील जवळपास 300 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये 550 पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांचा कायाकल्प करण्यासाठी शिलान्यास झाला आहे. आज उत्तर प्रदेशमधील ज्या गोमतीनगर रेल्वे स्थानकाचे लोकार्पण झाले आहे, त्या स्थानकाचे रूप खरोखरीच अतिशय देखणे दिसत आहे. याशिवाय 1500 पेक्षा जास्त रस्ते, उन्नत पूल, दुस-या पुलांच्या खालून जाणारे मार्ग, अशा योजनांचा आज सुरू झालेल्या कामांमध्ये समावेश आहे. 40 हजार कोटी रूपयांच्या या प्रकल्पांची कामे एकाच वेळी केली जाणार आहेत. काही महिन्यांपूर्वी आम्ही अमृत भारत स्थानक योजनेचा प्रारंभ केला होता. त्यावेळीही 500 पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणाच्या कामांना प्रारंभ केला गेला. आता हा कार्यक्रम आणखी पुढे नेला जात आहे. भारताच्या प्रगतीची रेलगाडी किती वेगाने धावते आहे, पुढे जात आहे, हे यावरून दिसून येते. या कामांबद्दल देशातील विविध राज्यांना, तिथल्या माझ्या सर्व नागरिक बंधू- भगिनींना मी अनेक- अनेक शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
आज विशेषत्वाने आपल्या युवावर्गातील मित्रांचे मी खूप -खूप अभिनंदन करतो. मोदी ज्यावेळी विकसित भारताविषयी बोलत असतात, त्यावेळी या सर्व गोष्टींचे सूत्रधार, केंद्रबिंदू आणि सर्वात मोठा लाभार्थी समूह - देशाची युवा पिढी आहे. आज या प्रकल्पांमुळे देशातील लाखों नवयुवकांना रोजगार आणि स्वरोजगारांच्या नवीन संधी मिळतील. आज रेल्वेचा जो कायाकल्प होत आहे, त्याचा लाभ जे आत्ता शाळा- महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत, त्यांना भरपूर होणार आहे. तसेच जे आज 30 ते 35 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहेत, त्यांनाही या प्रकल्पांचा खूप चांगला लाभ घेता येणार आहे. विकसित भारत, युवकांच्या स्वप्नातला भारत आहे. म्हणूनच विकसित भारत कसा असावा, हे निश्चित करण्याचा सर्वात जास्त अधिकारही त्यांनाच आहे. देशभरातील हजारो विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून विकसित भारतातील रेल्वेचे स्वप्न सर्वांसमोर मांडले, याचा मला आनंद वाटतो. यापैकी अनेक युवा मित्रांना त्याबद्दल पुरस्कारही मिळाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. देशाच्या प्रत्येक युवकाला मी सांगू इच्छितो की, तुमची स्वप्ने हाच मोदींचा संकल्प आहे. तुमचे स्वप्न, तुमचे परिश्रम आणि मोदींचा संकल्प, हीच विकसित भारताची हमी आहे.
मित्रांनो,
देशातील ही जी, अमृत भारत स्थानके आहेत, ती वारसा आणि विकास अशा दोन्ही गोष्टींचे प्रतीक असतील, याचा मला आनंद वाटतो. ओडिशाच्या बालेश्वर रेल्वे स्थानकाचे डिझाइन भगवान जगन्नाथ मंदिराच्या संकल्पनेवरून तयार केले आहे. सिक्कीमच्या रंगपो रेल्वे स्थानकावर तुम्हा लोकांना तिथल्या स्थानिक वास्तूकलेचा प्रभाव दिसून येईल. तर राजस्थानमधील सांगनेर रेल्वे स्थानकावर सोळाव्या शतकामध्ये हाताने केलेल्या छपाई कलेचा नमूना दिसून येईल. तामिळनाडूतील कुंभकोणम स्थानकाचे डिझाइन चोल काळातील वास्तूकलेवर आधारित आहे. अहमदाबाद रेल्वे स्थानकाचे डिझाइन मोढेरा सूर्य मंदिराच्या संकल्पनेवरून प्रेरणा घेवून तयार केले आहे. गुजरातमधल्या व्दारकेचे रेल्वे स्थानक व्दारकाधीश मंदिराच्या संकल्पनेनुसार बनवण्यात आले आहे. आयटी शहर गुरूग्रामचे रेल्वे स्थानक आयटीसाठीच समर्पित असेल. याचा अर्थ अमृत भारत स्थानके, त्या त्या शहरांचे वैशिष्ट्य काय आहे, याचा परिचय देतील. या स्थानकांची निर्मिती करतानाच दिव्यांग आणि वयोवृद्ध व्यक्ती, यांचा विचार करून, त्यांना सुविधा व्हावी, याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
मित्रांनो,
गेल्या 10 वर्षांमध्ये आपण सर्वांनी एक नवीन भारत बनवला जात आहे, हे पाहिले आहे. आणि रेल्वेमध्ये तर जे परिवर्तन घडून आले आहे, ते तुम्ही सर्वजण प्रत्यक्ष पहात आहातच. अशा सुविधा मिळाव्यात, याची कल्पना आपल्या देशातील लोक करीत होते. लोकांना वाटायचे, अशा सुविधा भारतातील रेल्वे प्रवाशांना मिळाल्या तर किती चांगले होईल... आता मात्र तुमच्यासाठी अशा सर्व सुविधा आम्ही केल्या आहेत, हे पाहत आहात. तुम्ही कधी काळी कल्पनेमध्ये विचार करीत होता, त्या सुविधा आता आम्ही प्रत्यक्षात केल्या आहेत, हे तुम्हाला दिसून येईल. एक दशकापूर्वीपर्यंत, देशात वंदे भारतसारखी आधुनिक, सेमी -हायस्पीड ट्रेन धावेल, याविषयी कधी विचार केला होता का, याविषयी कुणी काही ऐकले तरी होते का? कोणत्या तरी सरकारने अशा आधुनिक गाडीविषयी चर्चा केली होती का? एक दशकापूर्वी तर अमृत भारतसारख्या आधुनिक रेल्वेविषयी कल्पना करणेही खूप अवघड होते. एक दशकापूर्वी नमो भारतसारख्या शानदार रेल्वे सेवेविषयी कुणीही कधीही विचार केला नव्हता.
भारतीय रेल्वेचे विद्युतीकरण इतक्या वेगाने होईल, यावर एका दशकापूर्वीपर्यंत विश्वास बसला नसता. दशकभरापूर्वीपर्यंत गाड्यांमधील स्वच्छता आणि स्थानकांची स्वच्छता ही फारच मोठी गोष्ट मानली जात होती. आज हे सारे काही आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहे. एका दशकापूर्वीपर्यंत, मानवरहित फाटक हे भारतीय रेल्वेचे वैशिष्ट्य बनले होते, ते एक साधारण दृश्य होते. आज ओव्हरब्रिज आणि अंडरब्रिजमुळे अखंड आणि अपघातमुक्त वाहतूक सुनिश्चित झाली आहे. एका दशकापूर्वीपर्यंत लोकांना वाटत होते की विमानतळासारख्या आधुनिक सुविधा केवळ श्रीमंतांसाठीच आहेत. आज गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना विमानतळावर ज्या सुविधा आहेत त्याच सुविधांचा लाभ रेल्वे स्टेशनवर घेता येतो आहे. रेल्वेने प्रवास करणारे माझे गरीब बंधू-भगिनीही त्याच सुविधांचा लाभ घेत आहेत.
मित्रहो,
कित्येक दशके रेल्वेला आपल्याकडच्या स्वार्थी राजकारणाचा बळी व्हावे लागले. पण आता भारतीय रेल्वे देशवासीयांसाठी सुलभ प्रवासाचा मुख्य आधार ठरते आहे. रेल्वे तोट्यात असल्याचे रडगाणे सतत सुरू असे, तीच रेल्वे आज परिवर्तनाच्या सर्वात मोठ्या टप्पा अनुभवते आहे. हे सर्व आज घडत आहे कारण भारताने 11 व्या स्थानावरून झेप घेत 5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. 10 वर्षांपूर्वी, जेव्हा आपण 11व्या क्रमांकावर होतो, तेव्हा रेल्वेचे सरासरी बजेट सुमारे 45 हजार कोटी रुपये होते. आज आपण पाचवी आर्थिक शक्ती असताना या वर्षीचा रेल्वे अर्थसंकल्प अडीच लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. जरा कल्पना करा, जेव्हा आपण जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनू तेव्हा आपली ताकद किती वाढेल. त्यामुळे भारताला लवकरात लवकर जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी मोदी प्रयत्नशील आहेत.
पण मित्रहो,
तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. नद्या आणि कालव्यांमध्ये कितीही पाणी असले तरी बंधारा तुटला तर फारच कमी पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचेल. त्याचप्रमाणे अर्थसंकल्पातील तरतूद कितीही जास्त असली, तरीही घोटाळे आणि अप्रामाणिकपणा होत राहिला तर त्या अर्थसंकल्पातील चांगल्या तरतुदीचा परिणाम कधीच दिसून येणार नाही. गेल्या 10 वर्षात आपण मोठे घोटाळे आणि सरकारी पैशांची लूट वाचवली आहे. त्यामुळे गेल्या 10 वर्षांत नवीन रेल्वेमार्ग सुरू करण्याचा वेग दुपटीने वाढला आहे. आज जम्मू-काश्मीरपासून ईशान्येपर्यंत भारतीय रेल्वे अशा ठिकाणी पोहोचत आहे जिथे लोकांनी कल्पनाही केली नसेल. काम प्रामाणिकपणे झाले, म्हणूनच अडीच हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे काम झाले आहे. याचा अर्थ तुम्ही कर आणि तिकिटांच्या रूपात भरलेल्या पैशातील प्रत्येक पैसा आज रेल्वे प्रवाशांच्या हितासाठी वापरला जात आहे. भारत सरकार प्रत्येक रेल्वे तिकिटावर सुमारे 50 टक्के सूट देते.
मित्रहो,
ज्याप्रमाणे बँकेत ठेवलेल्या पैशावर व्याज मिळते, त्याचप्रमाणे पायाभूत सुविधांवर खर्च होणारा प्रत्येक पैसा उत्पन्नाचे नवीन स्रोत आणि नवीन रोजगार निर्माण करतो. नवीन रेल्वे मार्ग सुरू केल्यावर मजुरांपासून इंजिनीअरपर्यंत अनेकांना रोजगार मिळतो. सिमेंट, पोलाद, वाहतूक अशा अनेक उद्योग आणि दुकानांमध्ये नवीन रोजगाराच्या शक्यता निर्माण होतात. याचाच अर्थ आज जी लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक होत आहे, ती हजारो नोकऱ्यांचीही हमी आहे. जेव्हा स्थानके मोठी आणि आधुनिक होतील, जास्त गाड्या थांबतील, जास्त लोक येतील, तेव्हा जवळच्या रस्त्यावरील फेरीवाल्यांनाही त्याचा फायदा होईल. आमची रेल्वे लहान शेतकरी, छोटे कारागीर, आमचे विश्वकर्मा मित्र यांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देणार आहे. यासाठी वन स्टेशन वन प्रोडक्ट योजनेअंतर्गत स्टेशनवर खास दुकाने तयार करण्यात आली आहेत. आम्ही रेल्वे स्थानकांवर हजारो स्टॉल्स उभारून त्यांची उत्पादने विकण्यास त्यांना मदत करत आहोत.
मित्रहो,
भारतीय रेल्वे ही केवळ प्रवाशांसाठी सोयीची नाही तर देशाच्या कृषी आणि औद्योगिक प्रगतीची सर्वात मोठी वाहक आहे. ट्रेनचा वेग जास्त असेल तर वेळेची बचत होईल. यामुळे दूध, मासे, फळे, भाजीपाला आणि अशी अनेक उत्पादने वेगाने बाजारात पोहोचू शकतील. त्यामुळे उद्योगांचा खर्चही कमी होईल. यामुळे मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला चालना मिळेल. आज जगभरात गुंतवणुकीसाठी भारत हे सर्वात आकर्षक ठिकाण मानले जात आहे, आधुनिक पायाभूत सुविधा हे सुद्धा याचे एक मोठे कारण आहे. येत्या 5 वर्षात जेव्हा या हजारो स्थानकांचे आधुनिकीकरण होईल आणि भारतीय रेल्वेची क्षमता वाढेल, तेव्हा आणखी मोठी गुंतवणूक क्रांती घडेल. भारतीय रेल्वेच्या परिवर्तन मोहिमेसाठी मी पुन्हा एकदा माझ्या शुभेच्छा देतो. आणि सर्व देशवासियांनी मिळून एवढ्या मोठ्या कार्यक्रमात सहभागी होणे, लाखोंच्या संख्येने एकाच कार्यक्रमात सहभागी होणे, सर्व आदरणीय मुख्यमंत्र्यांनी, राज्यपालांनी वेळ काढणे, अशा प्रकारच्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने कदाचित भारतात एक नवीन संस्कृती अवतरली आहे. आजच्या कार्यक्रमाची ही रचना खूप चांगली रचना आहे, असे मला वाटते. भविष्यातही आपण अशाच प्रकारे वेळेचा सदुपयोग करून चारही दिशांना विकासाचा वेग वाढवू शकतो, हे आज आपण अनुभवले आहे. तुम्हालासुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद!
***
JPS/S.Bedekar/M.Pange/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2011081)
Visitor Counter : 118