पंतप्रधान कार्यालय
राजकोटचे माझ्या हृदयात नेहमीच विशेष स्थान राहिल: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Posted On:
24 FEB 2024 8:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या राजकोटशी असलेल्या दृढ संबंधांचे स्मरण करत मोदी आर्काइव्हमधील X या समाज माध्यमावरील पोस्ट सामायिक केली.
मोदी आर्काइव्हने एका पोस्टद्वारे खास क्षणाची आठवण करून दिली, जेव्हा 22 वर्षांपूर्वी 24 फेब्रुवारी 2002 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोट II मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकून पहिल्यांदाच आमदार म्हणून गुजरात विधानसभेत पाऊल ठेवले होते.
पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर पोस्ट केले;
“राजकोटचे माझ्या हृदयात नेहमीच विशेष स्थान असेल. या शहरातील जनतेने माझ्यावर विश्वास दाखवून मला पहिली निवडणूक जिंकून दिली. तेव्हापासून जनता जनार्दनाच्या आकांक्षांना न्याय देण्याचे काम मी निरंतर करत आलो आहे. हा देखील एक सुखद योगायोग आहे की मी आज आणि उद्या गुजरातमध्ये असेन आणि राजकोटमध्येच आयोजित, 5 एम्स राष्ट्राला समर्पित करणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होईन.”
* * *
M.Pange/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2008698)
Visitor Counter : 119
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam