नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डिजी यात्रा ॲप वापरकर्त्यांची संख्या 45.8 लाखांहून अधिक झाली

Posted On: 21 FEB 2024 4:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 21 फेब्रुवारी 2024

दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी प्राप्त माहितीनुसार, स्वतःच्या मोबाईल फोनमध्ये डिजी यात्रा ॲप्लिकेशन सुरु करून घेतलेल्या प्रवाशांची संख्या 45.8 लाख झाली आहे. 1 जानेवारी 2024 रोजी ही संख्या 38 लाख होती, त्यात 20.5 टक्के वाढ दिसून येत आहे.

20 फेब्रुवारी, 2024 रोजी डिजी यात्रा ॲप वापरणाऱ्यांची संख्या:

Sl. No.

Platform

As on 01/01/2024

As on 10/02/2024

% increase

i

Android:

17.3 Lakhs

21.2 Lakhs

~22.5%

ii

iOS Apple:

20.7 Lakhs

24.6 Lakhs

~19%

 

Total:

38.0 Lakhs

45.8 Lakhs

~20.5%

 

सुरुवातीला डिसेंबर 2022 मध्ये नवी दिल्ली, बेंगळूरू आणि वाराणसी या तीन शहरांतील विमानतळांवर डिजी यात्रा ॲपचा वापर सुरु झाला. नंतर देशातील आणखी 10 विमानतळांवर या सुविधेची सुरुवात करण्यात आली.

डिजी यात्रा सुविधा सुरु झाल्यापासून आतापर्यंत विमानतळांवर या सुविधेचा वापर करणाऱ्या प्रवाशांची एकूण संख्या पुढीलप्रमाणे आहे:

Airport

Cumulative Digi Yatra PAX till 31.12.2023

Cumulative Digi Yatra PAX till 11.02.2024

Delhi

34,24,937

42,62,167

Bengaluru

30,19,149

38,21,829

Varanasi

7,41,514

8,54,145

Hyderabad

10,61,638

14,92,776

Kolkata

15,85,350

20,34,544

Pune

83,42,63

10,68,112

Vijayawada

2,03,672

2,46,440

Cochin

58,976

1,15,335

Mumbai

1,42,667

2,84,469

Ahmedabad

1,12,069

1,71,226

Lucknow

27,421

48,691

Guwahati

28,655

53,379

Jaipur

20,577

42,178

Total

1,12,60,888

1,44,95,291

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने सुरु केलेल्या या माहिती तंत्रज्ञानविषयक उपक्रमामध्ये बायोमेट्रिक पडताळणी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. डिजी यात्रा सुविधेमुळे प्रवाशांना विमानतळावरील प्रवेशद्वारापाशी सुरळीत आणि सुलभ प्रवेश करता येतो.   

 

 

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2007737) Visitor Counter : 140