अर्थ मंत्रालय
नवी दिल्ली येथे डॉ. अरविंद पांगरिया यांच्या अध्यक्षतेखाली 16 व्या वित्त आयोगाची पहिली बैठक संपन्न
Posted On:
14 FEB 2024 3:03PM by PIB Mumbai
डॉ. अरविंद पांगरिया यांच्या अध्यक्षतेखाली जवाहर व्यापारी भवन, जनपथ, नवी दिल्ली येथे सोळाव्या वित्त आयोगाची (XVI-FC) पहिली बैठक पार पडली. सोळाव्या वित्त आयोगाचे सचिव ऋत्विक रंजनम पांडे आणि वित्त आयोगाच्या इतर अधिकाऱ्यांनी अध्यक्ष आणि सदस्यांचे स्वागत केले.
सोळाव्या वित्त आयोगाने राष्ट्रपतींनी जारी केलेल्या आदेशानुसार आणि अर्थ मंत्रालयाने दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी S.O. 5533(E) द्वारे जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आपल्या विचारार्थ विषयांवर चर्चा केली.
सोळाव्या वित्त आयोगाने राज्य सरकारे, स्थानिक स्वराज्य संस्था, भारत सरकारची मंत्रालये आणि तज्ञांसह विविध भागधारकांशी विस्तृत सल्लामसलत करण्याच्या गरजेला दुजोरा दिला.
तपशीलवार विश्लेषणात्मक कार्य करण्यासोबतच, अग्रगण्य संशोधन संस्था, अग्रगण्य थिंक टँक आणि विविध देशांमधील वित्तीय संबंधांच्या क्षेत्रात कार्यरत इतर संस्थांसह अन्य संस्थांकडून संपादन करण्याजोगे कौशल्य याची दखल सोळावा वित्त अयोग्य घेईल
सोळाव्या वित्त आयोगाने नवी दिल्लीमध्ये जनपथ येथील जवाहर व्यापारी भवनामध्ये आपले कार्यालय सुरू करायला मान्यता दिली.
सोळावा वित्त आयोग, 1 एप्रिल, 2026 पासून सुरू होत असलेल्या 5 वर्षांच्या कालावधीसाठी, 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपल्या शिफारशी उपलब्ध करून देईल.
***
S.Kakade/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2005959)
Visitor Counter : 796