ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय


ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स मंचावर प्रथमच,(ONDC) रास्त दर दुकान सुविधा उपलब्ध

Posted On: 07 FEB 2024 10:53AM by PIB Mumbai

डिजिटल इंडियाच्या दिशेने उचललेले एक पुढचे पाऊल म्हणून,भारतसरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे,सचिव श्री संजीव चोप्रा,यांनी हिमाचल प्रदेशातील उना आणि हमीरपूर जिल्ह्यात ओपन नेटवर्क डिजिटलवर रास्त भाव दुकान (FPSs) सुविधा उपलब्ध करण्यास  आरंभ  केला आहे. ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स (ONDC) मंचावर11  रास्त दर (FPS) दुकाने सुरू करण्यात आली आहेत -या पैकी  5  दुकाने(FPSs)उना मध्ये तर  6 (FPSs) हमीरपूर जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहेत.ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स (ONDC) मंचावर रास्त दर दुकाने ऑन-बोर्ड  येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या प्रसंगी बोलताना  चोप्रा म्हणाले की, या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे रास्त दर दुकानांचा कायापालट करण्याच्या विभागाच्या सतत सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये भर पडली आहे. या प्रयत्नांचा उद्देश लाभार्थ्यांचे समाधान करण्याबरोबरच FPS विक्रेत्यांच्या उत्पन्न वाढीचे अतिरिक्त मार्ग प्रदान करणे हा आहे.

या मंचाचे उदघाटन केल्यानंतर, उना आणि हमीरपूर जिल्ह्यातील विक्रेत्यांसाठी(FPS डीलर्स) प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेत उत्पादने, सेवा हमी आणि ONDC वर अडतीची रक्कम कशी द्यावी याबद्दल संबंधितांना माहिती देण्यात आली.

***

JPS/Sampada/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2003423) Visitor Counter : 125