गृह मंत्रालय
"2047 पर्यंत विकसित भारत हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प साकारण्यासाठी आराखडा दर्शवणारा अर्थसंकल्प’’ अशा शब्दात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाची केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
01 FEB 2024 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2024
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी, 2047 पर्यंत विकसित भारत हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प साकारण्यासाठी पथदर्शी आराखडा दर्शवणारा अर्थसंकल्प अशा शब्दात केंद्रीय अर्थसंकल्पाची प्रशंसा केली आहे.
एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केलेल्या मालिकेत, 2047 पर्यंत विकसित भारत हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प साकारण्यासाठी आराखडा दर्शवणारा अर्थसंकल्प अशा शब्दात केंद्रीय अर्थसंकल्पाची प्रशंसा केली आहे. प्रत्येक क्षेत्रात भारत अग्रेसर व्हावा, यासाठी मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात केलेल्या प्रवासातल्या महत्वाच्या कामगिरीवर अर्थसंकल्पीय भाषण प्रकाश टाकते. या कामगिरीच्या पायावर विकसित भारताचा प्रासाद उभारण्यात येत आहे. उत्कृष्टतेच्या या प्रवासात राष्ट्राचे नेतृत्व करण्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि अंतर्दृष्टीचे दर्शन घडविणा-या अर्थसंकल्पीय भाषणासाठी निर्मला सीतारामन यांचे हार्दिक आभार व्यक्त केले. मोदी सरकारने सादर केलेल्या, शेतकऱ्यांसाठी समर्पित असलेल्या विकसित भारत अर्थसंकल्पाने देशातल्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नव्या संधी आणल्या आहेत. मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प पर्यटन क्षेत्राला नवी उर्जा देईल असे केंद्रीय गृह मंत्र्यांनी म्हटले आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांच्या विकासासाठी प्रोत्साहन आणि दीर्घकालीन व्याजमुक्त कर्ज राज्यांना देण्यात येणार आहे यामुळे पर्यटन क्षेत्राची अर्थव्यवस्था बळकट होईल आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.लक्षद्वीप आणि इतर बेटासाठी हवाई दळणवळण सुरु करत त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडणाऱ्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ‘सूर्योदय योजना’ पंतप्रधानांचा दृष्टीकोन प्रतिबिंबित करत असून एक कोटी कुटुंबांना त्यांच्या घराच्या छतावर सौर उर्जा प्रणाली बसवून त्याद्वारे वीज निर्मिती शक्य होणार आहे. त्यांना दर महा 300 युनिट वीज मोफत मिळणार असून त्यामुळे त्यांची वर्षाला 15,000 ते 18,000 रुपयांची बचत होणार आहे असे शाह यांनी म्हटले आहे.
आयुष्मान भारत योजनेद्वारे मोदी जी यांनी आतापर्यंत 30 कोटीपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार पुरवले आहेत. आयुष्मान योजनेशी आशा सेविका, आंगणवाडी सेविका आणि सहाय्यक यांना जोडण्याचा महत्वाचा निर्णय आजच्या अर्थसंकल्पात घेण्यात आल्याने या वर्गालाही मोफत उपचाराचा लाभ घेता येईल.याशिवाय गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी 9 ते 14 वयोगटातल्या मुलींच्या लसीकरणाला प्रोत्साहन देण्याचा महत्वाचा निर्णयही आजच्या अर्थसंकल्पात घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
* * *
S.Bedekar/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2001687)
आगंतुक पटल : 240