अर्थ मंत्रालय
‘नारी शक्ती’ केंद्रस्थानी, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी लसीकरण करण्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली घोषणा
माता आणि बाल संगोपनाच्या विविध सरकारी योजनांत साधला जाणार समन्वय
डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह उपक्रमाचे सबलीकरण करण्यासाठी नव्याने डिझाइन केला यू-विन प्लॅटफॉर्म
प्रविष्टि तिथि:
01 FEB 2024 3:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2024
2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट ठेवून आणि नारी शक्तीला बळ देण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 सादर करत असताना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी लसीकरण करण्याचे आणि माता आणि बालकांच्या काळजीसाठी विविध सरकारी योजनांचे एकत्रीकरण करण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात मांडला आहे.
9 ते 14 वयोगटातील मुलींना होणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी हा लसीकरण कार्यक्रम हाती घेतला जाईल. शासन पात्र लाभार्थी श्रेणींमधील मुलींच्या लसीकरणास या योजनेमुळे प्रोत्साहन मिळेल,असेही त्या म्हणाल्या.
माता आणि बालसंगोपनासाठी कार्यान्वित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये समन्वय आणण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी एक सर्वसमावेशक कार्यक्रम तयार केला जाईल, असा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी मांडला आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, ‘सक्षम अंगणवाडी आणि पोषण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत अंगणवाडी केंद्रांच्या श्रेणीसुधारणेला गती दिली जाईल. यामुळे पोषक अन्नाचे वितरण, बालक विकास आणि संगोपन सुधारेल, असे प्रतिपादन अर्थमंत्र्यांनी व्यक्त केले.
सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमांना पुढे नेण्यासाठी नव्याने डिझाइन केलेले U-WIN प्लॅटफॉर्म देशभरात वेगाने पुढे आणले जावेत, असाही प्रस्ताव निर्मला सीतारामन यांनी मांडला आहे. या व्यासपीठाचा उपयोग लसीकरण व्यवस्थापन करण्यासाठी आणि मिशन इंद्रधनुष अंतर्गत केल्या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी केला जाईल, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
* * *
H.Akude/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2001364)
आगंतुक पटल : 298