संसदीय कामकाज मंत्रालय
संसदीय कामकाज मंत्र्यांनी 30 जानेवारीला संसदेतील राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बोलावली बैठक
संसदेचे अधिवेशन 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2024 दरम्यान होणार
प्रविष्टि तिथि:
29 JAN 2024 4:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जानेवारी 2024
संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहातील राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. उद्या, म्हणजे 30 जानेवारी 2024 रोजी संसद ग्रंथालय भवन, नवी दिल्ली येथे ही बैठक होणार आहे.
31 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने संसदेच्या अधिवेशनाला प्रारंभ होईल आणि आवश्यक ते सरकारी कामकाज पार पाडल्यानंतर 9 फेब्रुवारी 2024 रोजी अधिवेशन संपेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील.
* * *
R.Aghor/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2000375)
आगंतुक पटल : 335