पंतप्रधान कार्यालय
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांचे पंतप्रधानांनी केले स्वागत
प्रविष्टि तिथि:
25 JAN 2024 11:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांचे स्वागत केले.
उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात मॅक्रॉ सहभागी होणार आहेत ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
“माझे मित्र राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ, भारतात आपले सहर्ष स्वागत आहे.
मला आनंद आहे की राष्ट्रपती मॅक्रॉ यांनी आपल्या भारत दौऱ्याची सुरुवात राजस्थानमधील जयपूर येथून केली. जयपूर ही समृद्ध संस्कृती, वारसा आणि प्रतिभावान लोकांची भूमी आहे. उद्या, 26 जानेवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्यांची उपस्थिती केवळ दोन राष्ट्रांमधील संबंध मजबूत करत नाही तर आपली सामायिक मैत्री आणि सहकार्याच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण अध्याय देखील जोडते.”
* * *
R.Aghor/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1999794)
आगंतुक पटल : 131
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam