आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्रिमंडळाने (1) सी. आय. एल. आणि गेलच्या संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून ई. सी. एल. कमांड क्षेत्रात कोळसा-एस. एन. जी. प्रकल्प उभारण्यासाठी आणि (2) सी. आय. एल. आणि भेलच्या संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून एम. सी. एल. कमांड क्षेत्रात कोळसा- अमोनियम नायट्रेट प्रकल्प उभारण्यासाठी सी. आय. एल. च्या समभाग गुंतवणुकीला दिली मंजुरी

Posted On: 24 JAN 2024 8:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जानेवारी 2024 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने (1) सी. आय. एल. आणि गेलच्या संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून ई. सी. एल. कमांड क्षेत्रात कोळसा ते कृत्रिम नैसर्गिक वायू (सिंथेटिक नॅचरल गॅस) प्रकल्प उभारण्यासाठी आणि (2) सी. आय. एल. आणि भेलच्या संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून एम. सी. एल. कमांड क्षेत्रात कोळसा ते अमोनियम नायट्रेट प्रकल्प उभारण्यासाठी सी. आय. एल. च्या समभाग गुंतवणुकीला मंजुरी दिली.

सी. सी. ई. ए. ने सी. आय. एल. च्या समभाग गुंतवणुकीच्या प्रस्तावाला खालीलप्रमाणे मंजुरी दिली आहेः

  1. पश्चिम बंगालच्या बर्दवान जिल्ह्यातल्या ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (ईसीएल) च्या सोनेपूर बजारी परिसरात प्रस्तावित असलेल्या कोळसा-ते-सिंथेटिक नैसर्गिक वायू (एसएनजी) साठी 70:30 अशा कर्ज-समभाग गुणोत्तरावर विचार करून सीआयएलद्वारे 1,997.08 कोटी रुपयांचे ( 25% कमी अधिक)  समभाग भांडवल आणि अंदाजे 1 3,052.81 कोटी रुपयांच्या ( 25% कमी अधिक) प्रकल्पाच्या  भांडवली गुंतवणुकीसह, सीआयएल आणि गेल या कंपन्यांची संयुक्तपणे 51% समभाग गुंतवणूक.
  2. 70:30 अशा कर्ज-समभाग गुणोत्तरावर विचार करून सी. आय. एल द्वारे रु. 1,802.56 कोटी (25% कमी अधिक) समभाग भांडवल आणि संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून  अंदाजे 11,782.05 कोटी रुपये प्रकल्पाच्या  भांडवली गुंतवणुकीसह 51% समभाग  गुंतवणूक (25% कमी अधिक)  सी. आय. एल. आणि भेलच्या संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यातील महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड (MCL) च्या लखनपूर क्षेत्रात कोळसा ते अमोनियम नायट्रेट प्रकल्प उभारण्यासाठी सी. आय. एल. च्या समभाग गुंतवणुकीला मंजुरी.
  3. सी. आय. एल. द्वारे त्याच्या एकूण मालमत्तेच्या  30% पेक्षा जास्त  सी. आय. एल. आणि गेलच्या संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून वरील मुद्दा  (a) नुसार आणि सी. आय. एल. आणि भेलच्या संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून  वरील मुद्दा (b) नुसार समभाग गुंतवणुकीला मान्यता.

कोल इंडिया लिमिटेड (सी. आय. एल) सन 2030 पर्यंत 100 मेट्रिक टन MT कोळशाचे वायुकरण म्हणजे  गॅसिफिकेशनचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि भारताची आत्मनिर्भरता  आणि ऊर्जा स्वातंत्र्याची दुहेरी उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या उद्देशाने दोन कोळसा गॅसिफिकेशन संयंत्रांची स्थापना करेल:

  1. पश्चिम बंगालच्या बर्दवान जिल्ह्यातल्या ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (ईसीएल) च्या सोनेपूर बजारी परिसरात प्रस्तावित असलेला कोळसा-ते-सिंथेटिक नैसर्गिक वायू (एसएनजी) प्रकल्प उभारण्यासाठी 70:30 अशा कर्ज-समभाग गुणोत्तरावर विचार करून  सी. आय. एल ने सी. आय. एल. आणि गेलच्या संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून गेल सोबत सामंजस्य करार केला आहे, ज्याचा अंदाजे प्रकल्प खर्च रु. 13,052.81 कोटी रुपये (25% कमी अधिक) आहे  
  2. ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यातील महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड (एमसीएल) च्या लखनपूर परिसरात कोळसा- अमोनियम नायट्रेट प्रकल्प उभारण्यासाठी 70:30 अशा कर्ज-समभाग गुणोत्तरावर विचार करून भेलसोबत सामंजस्य करार केला आहे, ज्याचा अंदाजे प्रकल्प खर्च रु. 11,782.05 कोटी रुपये (25% कमी अधिक) आहे.  

 

* * *

R.Aghor/Vinayak/Bhakti/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1999370) Visitor Counter : 93