महिला आणि बालविकास मंत्रालय

असामान्य कामगिरीसाठी 19 बालकांना सहा श्रेणींमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 राष्ट्रपतींच्या हस्ते 22 जानेवारी रोजी केले जातील प्रदान.


पंतप्रधान 23 जानेवारी रोजी पुरस्कार विजेत्यांशी साधतील संवाद

Posted On: 19 JAN 2024 10:02AM by PIB Mumbai

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , 22 जानेवारी 2024 रोजी विज्ञान भवन येथे होणाऱ्या पुरस्कार समारंभात असामान्य कामगिरीसाठी  19 बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार, 2024 प्रदान करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी 2024 रोजीप्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्रीस्मृती झुबीन इराणी आणि राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई यांच्यासमवेत त्यांच्या संबंधित श्रेणींमधील असामान्य कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करतील आणि या बालकांशी संवाद साधतील.

कला आणि संस्कृती (7), शौर्य (1), नवोन्मेष (1), विज्ञान आणि तंत्रज्ञान (1), समाजसेवा (4) आणि क्रीडा (5) या क्षेत्रातील असामान्य कामगिरीसाठी देशातील सर्व प्रदेशांमधून निवडलेल्या 19 बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार, 2024 प्रदान केले जातील. आकांक्षी जिल्ह्यांसह 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील पुरस्कार विजेत्यांमध्ये मुले आणि 10 मुली  यांचा समावेश आहे.

बालकांच्या असामान्य कामगिरीसाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) पुरस्कार केन्द्र सरकार प्रदान करते. ते 18 वर्षे वयोगटातील बालकांना त्यांच्या उत्कृष्टतेसाठी हे पुरस्कार प्रदान केले जातात. पी. एम. आर. बी. पी. च्या प्रत्येक पुरस्कार विजेत्याला पदक आणि प्रमाणपत्र दिले जाते.

या वर्षी महिला आणि बालविकास मंत्रालयाने प्रादेशिक वृत्तपत्रे आणि सर्व प्रमुख राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन नामांकने वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. 

राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल नामांकनांसाठी मे 2023 ते 15 सप्टेंबर 2023 या दीर्घ कालावधीसाठी खुले ठेवण्यात आले होते. माध्यमातील यासंदर्भातील  माहितीची चाचपणी आणि पडताळणी करण्यासाठी  गेल्या वर्षांपासून  कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात होता. पात्र उमेदवारांची शिफारस करण्यासाठी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची (एन. सी. पी. सी. आर.) देखील निवड करण्यात आली.

जिल्हा दंडाधिकारी आणि क्षेत्र तज्ञांसह अनेक स्तरांद्वारे दाव्यांचा खरेपणा तपासण्यात आला आणि पडताळणी करण्यात आलीत्यानंतर विविध शाखांमधील तज्ञांचा समावेश असलेली छाननी समिती स्थापन करण्यात आली.

संगीत नाटक अकादमीकेंद्रीय राखीव पोलीस दलपर्यावरणवन आणि हवामान बदल मंत्रालयभारतीय अंतराळ संशोधन संस्थावैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागभारतीय सार्वजनिक प्रशासन संस्था आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यासारख्या विविध क्षेत्रांतील राष्ट्रीय स्तरावरील स्वतंत्र तज्ञांनीपडताळणी समितीच्या बैठकीनंतर निवडलेल्या माहितीची पुन्हा तपासणी केली. राष्ट्रीय निवड समितीने अंतिम निवडीसाठी निवडलेल्या बालकांच्या कामगिरीची तपासणी केली.

***

JPS/Vinayak /DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1997705) Visitor Counter : 109