माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विकसित भारत संकल्प यात्रेत दोन महिन्यांत 15 कोटी नागरिक सहभागी


विकसित भारत संकल्प यात्रेला विविध राज्यांमधून प्रचंड प्रतिसाद

Posted On: 17 JAN 2024 4:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 17 जानेवारी 2024

अवघ्या दोन महिन्यांत, विकसित भारत संकल्प यात्रेने 15 कोटींहून अधिक उत्साही नागरिकांच्या सहभागासह संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. हा प्रचंड लोकसहभाग,समृद्ध आणि सर्वसमावेशक भारताच्या दिशेने एकत्रित मार्ग विकसित करण्यात होत असलेल्या या यात्रेच्या प्रभावाला अधोरेखित करत आहे. देशभरात सरकारी योजनांचा लाभ 100% लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने  विकसित भारत संकल्प यात्रा या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाला आरंभ झाला आहे

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमध्ये ही  मोहीम सुरू झाल्यापासून त्यात सहभागी होत असलेला लोकसहभाग लक्षणीयरीत्या वाढला आहे. 13 डिसेंबर 2023 रोजी पूर्ण झालेल्या यात्रेच्या चौथ्या आठवड्याच्या शेवटी ही यात्रा 2.06 कोटी लोकांपर्यंत पोहोचली होती, तर 22 डिसेंबर 2023 पर्यंत पाचव्या आठवड्याच्या अखेरीस ही संख्या 5 कोटींवर पोहोचली होती. पुढील चार आठवड्यांत या  यात्रेत सामील होणाऱ्या नागरिकांची संख्या 10 कोटींपर्यंत  वाढत गेली असून आता 15 कोटींचा सहभाग नोंदवत महत्वपूर्ण टप्पा ओलांडत आहे. 17 जानेवारी रोजी विकसित भारत संकल्प यात्रेच्या  2.21 लाख ग्रामपंचायती आणि 9,541 शहरी ठिकाणे समाविष्ट करत 15.34 कोटी नागरिक यात सहभागी झाले असल्याची यात्रेच्या माहिती फलकाने दर्शवले आहे.

जन भागीदारी : प्रत्येक पाऊल समवेत :

यात्रेने "जन भागीदारी" (लोकसहभाग) या भावनेला मूर्त रूप दिले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा उपक्रमाला आरंभ केला असून,शहरे आणि गावांमध्ये प्रवास करणाऱ्या IEC व्हॅनद्वारे प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत कल्याणकारी योजनांसह पोहोचणे  हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या व्हॅनद्वारे, विविध ठिकाणच्या समुदायांना सरकारी योजना, शाश्वत शेती आणि परवडणारी आरोग्यसेवा, स्वच्छता आणि आर्थिक स्वातंत्र्य याविषयीची माहिती मिळत आहे.

आरोग्य शिबिरांमध्ये 4 कोटींहून अधिक लोकांची तपासणी :

17 जानेवारी 2023 पर्यंत, आरोग्य शिबिरांमध्ये 4 कोटींहून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली आहे. माय भारत वर 38 लाखांहून अधिक नोंदणी केली आहे.सर्वांसाठी सुलभ आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी 2 कोटींहून अधिक आयुष्मान भारत हेल्थ कार्ड वितरित करण्यात आली आहेत. या यात्रेने  दोन लाखांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये  प्रवास केला आहे. 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी 11 कोटींहून अधिक लोकांनी संकल्प  केला आहे.

दृश्य परिणाम, गावोगावी :

यात्रेचा प्रभाव निर्विवाद आहे. 1 लाखाहून अधिक ग्रामपंचायतींनी आयुष्मान कार्डांची 100% पूर्तता प्राप्त केली आहे, ज्यामुळे लाखो लोकांना आरोग्यसेवा उपलब्ध होत आहे. 'हर घर जल' योजनेद्वारे शुद्ध पाणी आता 79,000 हून अधिक ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचले आहे, तर 1.38 लाख ग्रामपंचायतींमधून 100% भूमी  अभिलेख डिजिटायझेशन  झाल्याने जमीन व्यवहारातील पारदर्शकता आणि सुरक्षितता सुलभ झाली आहे. शिवाय, 17,000 हून अधिक ग्रामपंचायतींनी ODF प्लस अनुपालन साध्य केले आहे, जे स्वच्छ जीवनमान प्रतीत करत  आहे.

आकडेवारीच्या पलीकडे, एक सामायिक  स्वप्न:

जिथे विकासाची गंगा प्रत्येकाच्या दारात पोहोचेल, जिथे समृद्धी सर्वांच्या वाट्याला येईल आणि जिथे विकासाचे रुपांतर सशक्त जीवनात होईल, अशा भारताचे सामुहिक स्वप्न पाहण्यासाठी जनमनात आस निर्माण करण्यामध्ये यात्रेचे खरे यश सामावले आहे.   प्रत्येक समाविष्ट  ग्रामपंचायत, प्रत्येक नोंदणीकृत लाभार्थी आणि घेतलेल्या प्रत्येक प्रतिज्ञेसह,ही  यात्रा भारताला हे स्वप्न सत्यात उतरवण्याच्या एक पाऊल जवळ घेऊन जाते.

N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1996982) Visitor Counter : 143