माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनच्या 55 व्या दीक्षांत समारंभात 700 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली पदव्युत्तर पदविका
Posted On:
10 JAN 2024 4:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 10 जानेवारी 2024
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (आयआयएमसी) चा 55 वा दीक्षांत समारंभ आज, 10 जानेवारी 2024 रोजी भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आयआयएमसी दिल्ली, आयआयएमसी ढेंकनाल, आयआयएमसी ऐझवाल, आयआयएमसी अमरावती, आयआयएमसी कोट्टायम आणि आयआयएमसी जम्मूच्या 2021-22 आणि 2022-23 च्या तुकडीतील 700 हून अधिक विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभात पदव्युत्तर पदविका प्रदान करण्यात आली.
विद्यार्थांना हिंदी पत्रकारिता, इंग्रजी पत्रकारिता, ओडिया पत्रकारिता, मराठी पत्रकारिता, मल्याळम पत्रकारिता, उर्दू पत्रकारिता, जाहिरात आणि जनसंपर्क, रेडिओ आणि टेलिव्हिजन पत्रकारिता आणि डिजिटल मिडिया या क्षेत्रातील पदव्युत्तर पदविका प्राप्त झाली. याशिवाय दोन्ही तुकड्यांमधील 65 विद्यार्थ्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (आयआयएमसी) च्या 55 व्या दीक्षांत समारंभात माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद पदवीधर विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की, आयआयएमसी सारख्या संस्थांमधून पदवीधर होणार्या भावी पत्रकारांना, पदवीधर विद्यार्थ्यांना हे सुनिश्चित करावे लागेल की, आपण फेक न्यूज (खोट्या बातम्या) आणि चुकीच्या माहितीच्या प्रसारा विरोधात लढा देऊ. ते म्हणाले की, आज कोणीही हेतुपुरस्सर चुकीची माहिती पसरवण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करू शकतो आणि असे 'डीपफेक्स', फेक न्यूज आणि चुकीची माहिती संपूर्ण जगापुढील मोठे आव्हान आहे.
माजी राष्ट्रपतींनी पदवीधर विद्यार्थ्यांना अधिक टीआरपी मिळविण्यासाठी खळबळजनक बातम्यांच्या प्रवृत्ती पासून दूर राहण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी अशा शॉर्टकटचा वापर करण्यापासून दूर राहावे, पत्रकारितेची मूल्ये जपावीत, असे त्यांनी सांगितले. 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याची ताकद तरुणांच्या हातात आहे, आणि त्यांनी या शक्तीचा हुशारीने वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
55 वा दीक्षांत समारंभ येथे पाहता येईल.
S.Kane/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1994874)
Visitor Counter : 105