पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आणि साहस पुरस्कार 2023 च्या विजेत्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
09 JAN 2024 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आणि साहस पुरस्कार 2023 च्या विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. पुरस्कार विजेत्यांची उल्लेखनीय कामगिरी आणि अतुलनीय समर्पणाचा विशेष उल्लेख करून प्रधानमंत्री म्हणाले की, त्यांनी केवळ आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली नाही, तर जगात भारताचे नाव उंचावले आहे.
राष्ट्रपती भवनात आयोजित राष्ट्रीय क्रीडा आणि साहस पुरस्कार 2023 समारंभाबाबत, X समाज माध्यमावरील राष्ट्रपतींच्या पोस्टला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी पोस्ट केले आहे:
“राष्ट्रीय क्रीडा आणि साहस पुरस्कार 2023 च्या नामवंत विजेत्यांचे अभिनंदन. त्यांची उल्लेखनीय कामगिरी आणि अजोड समर्पण आपल्या देशासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी केवळ आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली नाही, तर जगात भारताचा गौरव वाढवला आहे.
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1994684)
आगंतुक पटल : 180
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Kannada
,
Malayalam
,
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu