पंतप्रधान कार्यालय
10 व्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद 2024 च्या अनुषंगाने पंतप्रधानांनी मोझांबिकच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
09 JAN 2024 3:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, 09 जानेवारी 2024 रोजी मोझांबिकचे राष्ट्राध्यक्ष फिलीपे जॅकिंटो न्युसी यांची भेट घेतली.
यावेळी, मोझांबिकच्या विकासविषयक प्राधान्यक्रमांना पाठींबा देण्याबददल पंतप्रधान मोदी यांनी त्यांची ठाम वचनबद्धता व्यक्त केली.संरक्षण, दहशतवादाला प्रतिबंध, ऊर्जा, आरोग्य, व्यापार आणि गुंतवणूक, कृषी,जलसुरक्षा, खनन, क्षमता निर्मिती आणि सागरी सहकार्य यांसह इतर अनेक क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी फलदायी चर्चा केली. व्यापार, संस्कृती आणि लोकांदरम्यानचे संबंध यांना चालना देण्यासाठी हवाई संपर्क वाढवण्याच्या दिशेने दोन्ही देशांना प्रयत्न करता येतील अशी सूचना पंतप्रधानांनी केली.
जी-20 समूहामध्ये आफ्रिकन महासंघाचा (एयु) समावेश करून घेतल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष न्युसी यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.
वर्ष 2023 मधील जानेवारी आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ परिषदेमध्ये राष्ट्राध्यक्ष न्युसी यांनी घेतलेल्या सहभागाबद्दल पंतप्रधानांनी त्यांची मनापासून प्रशंसा केली.
विविध विकासात्मक प्रकल्प आणि क्षमता निर्मिती कार्यक्रमांसोबतच सागरी सुरक्षेच्या क्षेत्रात देखील भारताने दिलेल्या पाठींब्याबद्दल राष्ट्राध्यक्ष न्युसी यांनी भारताचे आभार मानले.
दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्याबाबत आणि दोन्ही देशांदरम्यान उच्च-स्तरीय राजकीय संबंध निर्माण करण्याचा वेग कायम राखण्याबाबत सहमती दर्शवली.
* * *
S.Patil/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1994534)
आगंतुक पटल : 154
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Malayalam