पंतप्रधान कार्यालय
हरिद्वारच्या शेतकऱ्याने मत्स्य संपदेच्या माध्यमातून आपले उत्पन्न दुप्पट करून पंतप्रधानांना केले प्रभावित
Posted On:
27 DEC 2023 3:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधितही केले.
विकसित भारत संकल्प यात्रेचे देशभरातील हजारो लाभार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील प्रतिनिधीही सहभागी झाले होते.
पंतप्रधानांनी हरिद्वारमधील गुरूदेव सिंग जी यांचे 'हर हर गंगे' म्हणत स्वागत केले. उपस्थितांनीही 'हर हर गंगे' चा प्रतिसाद देत त्यांचे स्वागत केले. सिंग हे शेतकरी आहेत आणि ते मत्स्यव्यवसायही करतात.
मत्स्य संपदा योजनेचा लाभ घेतल्यामुळे उत्पन्न दुप्पट कसे झाले याची माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली. आधी एक एकर जमिनीतून 60 हजार रुपये कमावत असे, आता मासेमारीच्या जोडधंद्यातून तितक्याच जमिनीतून दीड लाख रुपये कमवू शकत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी योजनांचा अभ्यास करत, कल्पकता दाखवल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली.
पशुपालन, मत्स्यपालन, मध उत्पादन याद्वारे शेतीचे उत्पन्न वाढवण्याच्या उपयुक्ततेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. हरित, श्वेत (दुग्ध) क्रांतीसह मधु क्रांती आणि नील क्रांतीच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला.
N.Chitale/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1990764)
Visitor Counter : 79
Read this release in:
Odia
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada