आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        विकसित भारत संकल्प यात्रा
                    
                    
                        
सर्वांना दर्जेदार आरोग्यसुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या उपक्रमात महत्त्वपूर्ण टप्पा गाठत, विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये 1 कोटीहून अधिक आयुष्मान कार्डे तयार करण्यात आली आहेत
एकूण 79,487 हून अधिक विकसित भारत आरोग्य शिबिरांना आतापर्यंत एकूण 1,31,66,365 जणांनी दिली भेट
                    
                
                
                    Posted On:
                22 DEC 2023 6:18PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली 22 डिसेंबर 2023
भारतातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचे झालेले बळकटीकरण आणि आरोग्य सुविधा क्षेत्राच्या उत्कृष्टतेला चालना यांचे दर्शन घडवणाऱ्या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये देशाने एक प्रशंसनीय कामगिरी करून दाखवली आहे. विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान 1,02,23,619 आयुष्मान कार्डे तयार करण्यात आली आहेत.
सध्या देशभर सुरु असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान 3,462 ग्राम पंचायती आणि शहरी संस्थामध्ये आयोजित 79,487 आरोग्य शिबिरांमध्ये सहभागी झालेल्यांची एकूण संख्या आता 1,31,66,365 पर्यंत पोहोचली आहे.

 
 
या आरोग्य शिबिरांमध्ये खालील उपक्रम राबवण्यात येत आहेत:
आयुष्मान भारत - पंतप्रधान जन आरोग्य योजना(एबी-पीएमजेएवाय) : विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे राबवण्यात येत असलेल्या महत्त्वाच्या सरकारी कार्यक्रमाअंतर्गत, आयुष्मान अॅपचा वापर करून नागरिकांची आयुष्मान कार्डे तयार करण्यात येत आहेत. तसेच या भौतिक स्वरूपातील कार्डांचे लाभार्थ्यांना प्रत्यक्षात वितरण करण्यात येत आहे. आतापर्यंत 23,83,473 कार्डांचे प्रत्यक्षात वाटप करण्यात आले आहे. काल दिवसभरात या आरोग्य शिबिरांमध्ये एकूण 6,34,168 आयुष्मान कार्डे तयार करण्यात आली.
क्षयरोग (टीबी): या शिबिरांना भेट देणाऱ्यांपैकी कोणाला क्षयरोगाची लागण झाली आहे का हे तपासण्यासाठी, त्यांची लक्षणे, थुंकीची तपासणी तसेच जेथे एनएएटी यंत्रे उपलब्ध आहेत तेथे या यंत्रांच्या सहाय्याने चाचण्या करण्यात येत आहेत. संशयित क्षयरोग रुग्णांना अधिक उच्च स्तरावरील आरोग्य सुविधा केंद्रांकडे वर्ग करण्यात आले आहे. 36 व्या दिवसाच्या अखेरीस, क्षयरोगाची शक्यता तपासण्यासाठी 49,17,356 लोकांची तपासणी करण्यात आली आणि त्यापैकी 3,41,499 लोकांना पुढील उपचारासाठी अधिक उच्च स्तरावरील सुविधा असणाऱ्या सार्वजनिक आरोग्य केंद्रांकडे पाठवण्यात आले.
 
पंतप्रधान क्षयरोगमुक्त भारत अभियाना(पीएमटीबीएमबीए)अंतर्गत, निक्षय मित्रांकडून मदत स्वीकारण्याच्या संदर्भात क्षयरोग झालेल्या रुग्णांकडून संमती घेण्यात येत आहे. आरोग्य शिबिरांमध्ये सहभागी झालेल्यांपैकी ज्यांना निक्षय मित्र म्हणून काम करण्याची इच्छा असेल त्यांची त्याच शिबिरांमध्ये नोंदणी करून घेण्यात येत आहे. आतापर्यंत या शिबिरांमध्ये 1,17,734 रुग्णांनी पीएमटीबीएमबीए अंतर्गत उपचारांसाठी संमती दिली आहे आणि 39,819 हून अधिक नव्या निक्षय मित्रांची नोंदणी करण्यात आली आहे.
 
निक्षय पोषण योजने(एनपीवाय)अंतर्गत, थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून क्षयरोगाच्या रुग्णांना आर्थिक मदत देण्यात येत आहे. यासाठी, मदतीपासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्याचे तपशील संकलित करण्यात येत आहेत आणि त्यांच्या बँक खात्यांना आधार क्रमांकांशी जोडण्यात येत आहे. अशा 30,093 लाभार्थ्यांचे तपशील संकलित करण्यात आले आहेत.
सिकल सेल आजार: आदिवासीबहुल लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये, सिकल सेल आजारासाठीची पॉईंट ऑफ केअर (पीओसी) किंवा विद्राव्यता चाचणी यांच्या माध्यमातून हा आजार होण्याची अधिक शक्यता असणाऱ्या लोकसंख्येमध्ये (40 वर्षांपर्यंत वय असलेले नागरिक) सिकल सेल आजारासाठी (एससीडी) चाचण्या करण्यात येत आहेत. या चाचण्यांतून एससीडी आहे असे निदान झालेल्यांना आजाराच्या व्यवस्थापनासाठी वरच्या पातळीवरील आरोग्य केंद्रांकडे वर्ग करण्यात आले आहे. आतापर्यंत, 5,08,701 हून अधिक व्यक्तींची एससीडीसाठी तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 21,793 जणांना एससीडी आहे असे निदान झाल्याने या लोकांना उच्च स्तरावरील सार्वजनिक आरोग्य सुविधा केंद्रांकडे वर्ग करण्यात आले आहे.  
अ-संसर्गजन्य आजार (एनसीडीज): रक्तदाब आणि मधुमेह यांसारखे आजार होऊ शकणाऱ्या (वय वर्षे 30 आणि त्याहून अधिक वय असलेल्या) लोकांची या रोगांच्या शक्यतेसाठी चाचणी करण्यात आली आणि यापैकी एखादा आजार झाला आहे असा संशय असलेल्या रुग्णांना अधिक सुविधा असणाऱ्या आरोग्य केंद्रांकडे पाठवण्यात आले. रक्तदाब आणि मधुमेह या रोगांची शक्यता तपासण्यासाठी सुमारे 10,297,809 लोकांची चाचणी करण्यात आली. यापैकी 4,82,667 हून अधिक व्यक्तींना रक्तदाबाचा आजार असल्याची तसेच 3,45,898 हून अधिक व्यक्तींना मधुमेह असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आणि 7,59,451 व्यक्तींना उच्च स्तरावरील सार्वजनिक आरोग्य सुविधा केंद्रांकडे वर्ग करण्यात आले.
 
N.Meshram/S.Chitnis/P.Malandkar
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com   /PIBMumbai
/PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai
 
                
                
                
                
                
                (Release ID: 1989679)
                Visitor Counter : 180
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali-TR 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada