आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विकसित भारत संकल्प यात्रा


देशभरात आयोजित 65,300 हून अधिक विकसित भारत आरोग्य शिबिरांना एकूण एक कोटीहून अधिक लोकांनी दिली भेट

या शिबिरांमध्ये 84 लाखांहून अधिक आयुष्मान कार्डे तयार करण्यात आली

क्षयरोगाची लागण झाली असण्याची शक्यता तपासण्यासाठी या शिबिरांमध्ये 36.4 लाख लोकांची प्राथमिक तपासणी करण्यात येऊन त्यापैकी 2.6 लाखांहून अधिक रुग्णांना उपचारासाठी उच्च स्तरावरील सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये पाठवण्यात आले

सिकल सेल आजाराची शक्यता तपासण्यासाठी 3.8 लाखांहून अधिक व्यक्तींची तपासणी करण्यात आली आणि त्यातील 18,000 हून अधिक व्यक्तींना पुढील उपचारांसाठी उच्च स्तरावरील सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये पाठवण्यात आले

Posted On: 19 DEC 2023 5:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 डिसेंबर 2023 

 

देशभरात सध्या सुरु असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या उपक्रमाअंतर्गत देशातील 3,156 ग्राम पंचायती तसेच शहरी स्थानिक संस्थांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 65,348 आरोग्य शिबिरांमध्ये आतापर्यंत एकूण 1,03,55,555 नागरिक सहभागी झाले.

या आरोग्य शिबिरांमध्ये खालील उपक्रम राबवण्यात येत आहेत:

आयुष्मान भारत -पंतप्रधान जन आरोग्य योजना(एबी-पीएमजेएवाय) : विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे राबवण्यात येत असलेल्या महत्त्वाच्या सरकारी कार्यक्रमाअंतर्गत, आयुष्मान अॅपचा वापर करून नागरिकांची आयुष्मान कार्डे तयार करण्यात येत आहेत तसेच लाभार्थ्यांना या भौतिक स्वरूपातील कार्डांचे प्रत्यक्षात वितरण करण्यात येत आहे. आतापर्यंत 19,03,200 कार्डांचे प्रत्यक्षात वाटप करण्यात आले आहे.

काल दिवसभरात या आरोग्य शिबिरांमध्ये एकूण 5,31,025 आयुष्मान कार्डे तयार करण्यात आली. आतापर्यंत या शिबिरांमध्ये एकूण 84,27,500 कार्डे तयार करण्यात आली आहेत.

क्षयरोग (टीबी): या शिबिरांना भेट देणाऱ्या लोकांपैकी काहींना  क्षयरोगाची लागण झाल्याची शक्यता तपासण्यासाठी, त्यांची लक्षणे, थुंकीची तपासणी तसेच जेथे एनएएटी यंत्रे उपलब्ध आहेत, तेथे या यंत्रांच्या सहाय्याने चाचण्या करण्यात येत आहेत. क्षयरोग झाला आहे अशी शंका येत असलेल्या लोकांना अधिक उच्च स्तरावरील आरोग्य सुविधा केंद्रांकडे वर्ग करण्यात आले आहे. या यात्रेच्या 34 व्या दिवशी, क्षयरोगाची शक्यता तपासण्यासाठी 36,48,700 लोकांची तपासणी करण्यात आली आणि त्यापैकी 2,63,000 लोकांना उपचाराच्या अधिक उच्च स्तरावरील सुविधा असणाऱ्या आरोग्य केंद्रांकडे पाठवण्यात आले.

पंतप्रधान क्षयरोगमुक्त भारत अभियाना (पीएमटीबीएमबीए) अंतर्गत, निक्षय मित्रांकडून मदत मिळण्याच्या संदर्भात क्षयरोग झालेल्या रुग्णांकडून संमती घेण्यात येत आहे. आरोग्य शिबिरांमध्ये सहभागी झालेल्यांपैकी ज्यांना निक्षय मित्र म्हणून काम करण्याची इच्छा असेल त्यांची त्याचवेळी नोंदणी करून घेण्यात येत आहे.  आतापर्यंत या शिबिरांमध्ये 1,19,500 रुग्णांनी पीएमटीबीएमबीए अंतर्गत उपचारांसाठी संमती दिली आहे आणि 46,700 हून अधिक नव्या निक्षय मित्रांची नोंदणी करण्यात आली आहे.

निक्षय पोषण योजने (एनपीवाय) अंतर्गत, क्षयरोगाच्या रुग्णांना थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात येत आहे. यासाठी, मदत प्रलंबित राहिलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्याचे तपशील संकलित करण्यात येत आहेत आणि बँक खात्यांना आधार क्रमांकांशी जोडण्यात येत आहे. अशा 31,300 लाभार्थ्यांचे तपशील संकलित करण्यात आले आहेत.

सिकल सेल आजार: प्रामुख्याने आदिवासींची लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये, सिकल सेल आजारासाठीची पॉईंट ऑफ केअर (पीओसी) किंवा विद्राव्यता चाचणी यांच्या माध्यमातून पात्र लोकसंख्येमध्ये (40 वर्षांपर्यंत वय असलेले नागरिक) सिकल सेल आजाराची (एससीडी) शक्यता तपासण्यात येत आहे. चाचण्यांतून एससीडी आहे असे निदान झालेल्यांना आजाराच्या व्यवस्थापनासाठी वरच्या पातळीवरील आरोग्य केंद्रांकडे वर्ग करण्यात आले आहे. आतापर्यंत, 3,83,000 लोकांची एससीडीसाठी तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 18,300 जणांना एससीडी आहे असे निदान हाती आल्याने या लोकांना उच्च स्तरावरील सार्वजनिक आरोग्य सुविधा केंद्रांकडे वर्ग करण्यात आले आहे.  

अ-संसर्गजन्य आजार (एनसीडीज): रक्तदाब आणि मधुमेह यांसारखे आजार होऊ शकणाऱ्या लोकांची (वय वर्षे 30 आणि त्याहून अधिक वय असलेल्या) या रोगांच्या शक्यतेसाठी तपासणी करण्यात आली आणि यापैकी एखादा आजार झाला आहे असा संशय असलेल्या रुग्णांना अधिक सुविधा असणाऱ्या आरोग्य केंद्रांकडे पाठवण्यात आले. रक्तदाब आणि मधुमेह या रोगांची शक्यता तपासण्यासाठी सुमारे 81,15,500 लोकांची तपासणी करण्यात आली. यापैकी 3,74,000 हून अधिक व्यक्तींना रक्तदाबाचा विकार असल्याची तसेच 2,69,800 हून अधिक व्यक्तींना मधुमेह असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आणि 5,99,200 व्यक्तींना उच्च स्तरावरील सार्वजनिक आरोग्य सुविधा केंद्रांकडे वर्ग करण्यात आले.

अंदमान आणि निकोबार बेटे

 

पल्नाडू, आंध्रप्रदेश

 

अप्पर सियांग, अरुणाचल प्रदेश

 

उडलगुरी, आसाम

 

दक्षिण गोवा, गोवा

 

रोहतक, हरियाणा

 

पार्श्वभूमी:

केंद्र सरकारी योजनांचा लाभ देशभरातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील खुंटी येथून दिनांक 15 नोव्हेंबर पासून विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रारंभ केला. या विकसित भारत संकल्प यात्रेच्या उपक्रमाअंतर्गत प्रत्यक्ष स्थळी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सेवांचा भाग म्हणून, ज्या ग्राम पंचायतींमध्ये आयईसी व्हॅन्सना थांबा दिलेला आहे, तेथे आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

 

* * *

S.Tupe/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1988341) Visitor Counter : 77