पंतप्रधान कार्यालय
आसामच्या कल्याणी राजबोंगशी यांनी 1000 विक्रेत्यांना स्वनिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी केले प्रोत्साहित
आसाम गौरव पुरस्काराने सन्मानित या महिलेने आपल्या सामाजिक सेवेच्या भावनेने पंतप्रधानांना केले प्रभावित
"जेव्हा स्त्री स्वावलंबी होते तेव्हा त्याचा समाजालाही खूप फायदा होतो याचे तुम्ही जिवंत उदाहरण आहात"
Posted On:
16 DEC 2023 6:07PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममधील विकसित भारत संकल्प यात्रेला हिरवा झेंडा दाखवला.
गुवाहाटी येथील गृहिणी कल्याणी राजबोंगशी, ज्या एक स्वयंसहाय्यता बचत गट चालवत आहेत आणि त्यांनी एक क्षेत्र-स्तरीय संघटना आणि अन्न प्रक्रिया उद्योग सुरू केला असून त्यांना आसाम गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.जेव्हा पंतप्रधानांनी त्यांची यशोगाथा ऐकली तेव्हा त्यांनी कल्याणीजींना सांगितले की त्यांच्या नावातूनच जनतेचे कल्याण प्रतिबिंबीत होते.
आपल्या उद्योगाच्या आर्थिक उत्क्रांती बद्दल त्यांनी माहिती दिली की त्यांनी प्रथम 2000 रुपयांच्या मदतीने मशरूम उद्योगाची सुरुवात केली आणि त्यानंतर आसाम सरकारने दिलेल्या 15,000 रुपयांच्या अनुदानाच्या मदतीने त्यांनी आपला अन्न प्रक्रिया उद्योग सुरू केला. यानंतर त्यांनी 200 महिलांसोबत क्षेत्र-स्तरीय संघटना स्थापना केली. त्यांना पीएमएफएमई (प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइझ स्कीम) अंतर्गत देखील मदत मिळाली. पंतप्रधान स्वनिधी योजनेबद्दल एक हजार विक्रेत्यांना शिक्षित केल्याबद्दल त्यांना"आसाम गौरव" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘मोदी की ग्यारंटी की गाडी’ या विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे स्वागत करण्यासाठी त्यांनी परिसरातील महिलांना एकत्र आणले आणि त्यांना त्या ज्या योजनांसाठी पात्र आहेत त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले आणि त्यांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित देखील केले. पंतप्रधानांनी त्यांना आपली उद्यम आणि समाजसेवेची भावना कायम ठेवण्यास सांगितले. “जेव्हा एखादी महिला स्वावलंबी होते, तेव्हा समाजाला त्याचा मोठा फायदा होतो याचे तुम्ही जिवंत उदाहरण आहात”, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले.
***
S.Kane/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1987217)
Visitor Counter : 109
Read this release in:
Telugu
,
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam