शिक्षण मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या काशी तामिळ संगमम् च्या दुसऱ्या टप्प्याचे करणार उद्घाटन

Posted On: 16 DEC 2023 11:58AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेनुसार, 17 डिसेंबर 2023 रोजी नमो घाट येथे काशी तमिळ संगमम् 2023 चे उद्घाटन करतील. याप्रसंगी पंतप्रधान कन्याकुमारी - वाराणसी तमिळ संगमम् रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून  रवाना करतील. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल;  केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच नवउद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान;  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ;  आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

काशी तमिळ संगमम् चा दुसरा टप्पा 17 ते 30 डिसेंबर 2023 या कालावधीत काशी (वाराणसी) या पवित्र शहरात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तमिळ शिष्टमंडळाची पहिली तुकडी 15 डिसेंबर 2023 रोजी चेन्नईहून रवाना झाली आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारे जवळपास 1400 (प्रत्येकी 200 व्यक्तींचे 7 गट) प्रतिनिधी तामिळनाडूच्या विविध भागांतून या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रवास करतील. हे प्रतिनिधी काशीतील त्यांच्या मुक्कामादरम्यान, आपल्या दौऱ्याच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार प्रयागराज आणि अयोध्येलाही भेट देतील.

प्रतिनिधींच्या या सात गटांना भारतातील सात पवित्र नद्यांची नावे देण्यात आली आहेत, ती अशी:- विद्यार्थी गट (गंगा), शिक्षक गट (यमुना), व्यावसायिक गट (गोदावरी), अध्यात्मिक गट (सरस्वती), शेतकरी आणि कारागीर गट (नर्मदा), लेखक गट (सिंधू) आणि व्यापारी गट (कावेरी). हे गट चेन्नई, कोईम्बतूर आणि कन्याकुमारी ते काशी असा प्रवास करतील.  8 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या नोंदणीच्या काळात 42,000 हून अधिक जणांनी आपली नाव नोंदणी केली आहे. त्यामधूनच प्रत्येक गटासाठी 200 जणांना निवड समितीने निवडले आहे.

भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय, या कार्यक्रमासाठी नोडल संस्था म्हणून काम करणार असून यामध्ये सांस्कृतिक, पर्यटन, रेल्वे, वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, माहिती आणि प्रसारण, कौशल्य विकास आणि उद्योजकता, उत्तर प्रदेश सरकारच्या IRCTC आणि संबंधित विभागांचा सहभाग असेल. .

Image

Image

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1987131) Visitor Counter : 95