माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लक्षवेधी कार्यक्रम: यात्रा मार्गस्थ होताना शेतकरी-स्नेही ड्रोन पाहून हजारो लोक मंत्रमुग्ध


"केंद्र सरकार हजारो महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन पुरवणार.कृषी कामासाठी आम्ही ड्रोन सेवा करणार उपलब्ध"

"सुरुवातीला, 15 हजार महिला बचत गटांच्या माध्‍यमातून ड्रोन प्रशिक्षण मोहीम सक्षम करतील आणि स्वप्नांना भरारी देतील"

Posted On: 12 DEC 2023 9:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2023


पंतप्रधान नरेंद्र मोदी

(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023च्या स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणातील अवतरणे )

आदिवासी गौरव दिवसाच्या शुभ मुहूर्तावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त झारखंडच्या खुंटी येथून विकसित भारत संकल्प यात्रेचे (व्हीबीएसवाय) उद्घाटन केले. सरकारी कल्याणकारी कार्यक्रम तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा देशव्यापी उपक्रम म्हणून सुरू झालेल्या कामाला आता एक नाविन्यपूर्ण वळण मिळाले आहे, जे कृषी आणि संबंधित उपक्रमांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाची  परिवर्तनीय शक्ती दर्शवते.

2.60 लाख ग्रामपंचायती आणि 4,000 हून अधिक शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचलेला विकसित भारत संकल्प यात्रा हा भव्य उपक्रम प्रगती आणि सर्वसमावेशकतेचे प्रतीक बनला आहे.

यात्रेला जसजशी चालना मिळत आहे, तसतसा लक्षवेधक उल्लेखनीय पैलू म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये ड्रोनचे एकत्रीकरण. शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सक्षम करण्याबरोबरच त्यांना उत्पादकता आणि शाश्वत पद्धती वाढविण्यासाठी साधने प्रदान करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

ड्रोन -कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण

लोक आतुरतेने कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेल्या व्हीबीएसवाय आयईसी व्हॅन्स आणि ड्रोन प्रदर्शनाची वाट पाहतात. गुंजन करत उडणारी यंत्रे प्रेक्षकांना, विशेषत: शेतकर्‍यांना मंत्रमुग्ध करतात कारण संपूर्ण मोहिमेदरम्यान थेट प्रात्यक्षिके घेतली जात आहेत. ही प्रात्यक्षिके कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी ड्रोनची क्षमता स्पष्ट करतात. केवळ वाढीव कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित केले जात नाही तर माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी शेतकऱ्यांना ज्ञान आणि साधनांसह सक्षम बनवणे यावर लक्ष केंद्रित केले आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यात, ड्रोन प्रात्यक्षिकांचे शेतकरी समुदायाकडून विशेषत: महिला शेतकऱ्यांकडून विशेष कौतुक केले जात आहे. केरळपासून हिमाचल प्रदेशपर्यंत, गुजरातपासून त्रिपुरापर्यंत ड्रोन हे शेतीतील सकारात्मक बदलासाठी उत्प्रेरक असल्याचा स्पष्ट संदेश देतात.

थेट प्रात्यक्षिके खतांचा संतुलित वापर दर्शववतात तसेच अतिरिक्त रासायनिक खत टाळण्याच्या महत्त्वावर भर देतात. ड्रोनद्वारे नॅनो युरिया, नॅनो डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) आणि इतर सूक्ष्म पोषक खतांची फवारणी म्हणजे तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये नेमकेपणा आणि कार्यक्षमता आल्याचे द्योतक होय. ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीच्या थेट प्रात्यक्षिकाने प्रभावी कीड व्यवस्थापनात या तंत्रज्ञानाच्या क्षमतेवर प्रकाश टाकला. द्रव खते आणि कीटकनाशकांच्या हवाई फवारणीचे थेट प्रात्यक्षिक मर्यादित कालावधीत खतांच्या अतिवापरावर नियंत्रण ठेवणाऱ्या पद्धतीला प्रोत्साहन देते.

नारी शक्ती: ड्रोनच्या क्षमतांची चाचपणी

महिलांच्या नेतृत्वाखालील विकास सुनिश्चित करण्याचा पंतप्रधानांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. या दिशेने आणखी एक पाऊल म्हणून पंतप्रधानांनी प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्र सुरू केले.

कोमलपती वेंकट रावनम्मा या आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील एका स्वयं-सहायता गटाच्या सदस्य आहेत. शेतीसाठी ड्रोन उडवण्याचे कौशल्य त्यांनी अवघ्या 12 दिवसांत आत्मसात केले आणि 30 नोव्हेंबर रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधानांसोबत स्वानुभव सामायिक केले.

जेव्हा पंतप्रधानांनी खेड्यांमध्ये कृषी उद्देशांसाठी ड्रोन वापरण्याच्या परिणामाबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की ते पाण्याशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यास मदत करते आणि वेळेची कार्यक्षमता देखील अनुकूल करते.

भारताच्या नारी शक्तीच्या सामर्थ्यावर शंका घेणाऱ्यांसाठी कोमलपती व्यंकट सारख्या महिला उदाहरण आहेत यावर पंतप्रधानांनी भर दिला. नजीकच्या भविष्यात कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचे प्रतीक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच, त्यांनी विकसित भारत संकल्प यात्रेत महिलांच्या सहभागाचे महत्त्व उद्धृत केले.

S.Bedekar/V.Joshi/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1985672) Visitor Counter : 128