पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 डिसेंबर रोजी डेहराडून येथे भेट देणार
‘उत्तराखंड जागतिक गुंतवणूकदार परिषद 2023’ चे उद्घाटन करणार
शांततेकडून समृद्धीकडे ही परिषदेची संकल्पना
उत्तराखंडला गुंतवणुकीचे नवीन ठिकाण म्हणून प्रस्थापित करण्याचे परिषदेचे उद्दिष्ट
प्रविष्टि तिथि:
06 DEC 2023 3:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 डिसेंबर 2023 रोजी उत्तराखंडमध्ये डेहराडून येथे भेट देणार आहेत. सकाळी 10:30 वाजता ते डेहराडून येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित 'उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2023', अर्थात उत्तराखंड जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे उद्घाटन करतील. या कार्यक्रमाला ते संबोधितही करतील.
उत्तराखंड जागतिक गुंतवणूकदार परिषद 2023, हे उत्तराखंडला गुंतवणुकीचे नवीन ठिकाण म्हणून प्रस्थापित करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. 8 आणि 9 डिसेंबर 2023 रोजी ही दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली असून, ‘शांततेकडून समृद्धतेकडे’, अशी या परिषदेची संकल्पना आहे.
या परिषदेला जगभरातील हजारो गुंतवणूकदार आणि प्रतिनिधी उपस्थित राहतील. यामध्ये केंद्रीय मंत्री, विविध देशांचे राजदूत यांच्यासह आघाडीच्या उद्योगपतींचा सहभाग असेल.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1983081)
आगंतुक पटल : 145
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Urdu
,
Kannada
,
Assamese
,
English
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam