पंतप्रधान कार्यालय

भारत आणि स्वीडन यांनी कॉप -28 मध्ये उद्योग संक्रमणासाठी नेतृत्व  गटाच्या दुसऱ्या टप्प्याचे भूषवले सह-यजमानपद

Posted On: 01 DEC 2023 8:29PM by PIB Mumbai

 

दुबई येथे कॉप-28 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वीडनचे पंतप्रधान  उल्फ क्रिस्टरसन यांनी संयुक्तपणे   2024-26 या कालावधीसाठी उद्योग संक्रमणासाठी नेतृत्व  गटाच्या दुसऱ्या टप्प्याचे (LeadIT 2.0) उदघाटन केले. भारत आणि स्वीडन यांनी इंडस्ट्री ट्रांझिशन प्लॅटफॉर्मचे देखील उदघाटन केले . हा प्लॅटफॉर्म दोन्ही देशांची सरकारे, उद्योग, तंत्रज्ञान पुरवठादार, संशोधक आणि विचारवंत  यांना एकमेकांशी जोडेल.

कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी अधोरेखित केले की LeadIT 2.0  पुढील गोष्टींवर लक्ष केंद्रित करेल:

सर्वसमावेशक आणि न्याय्य उद्योग संक्रमण

कमी-कार्बन तंत्रज्ञानाचा सह-विकास आणि हस्तांतरण

उद्योग संक्रमणासाठी उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना आर्थिक सहाय्य

2019 मध्ये भारत आणि स्वीडनने संयुक्तपणे  न्यूयॉर्कमध्ये  संयुक्त राष्ट्र हवामान कृती शिखर परिषदेत LeadIT चे उदघाटन केले  होते.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1981780) Visitor Counter : 64