पंतप्रधान कार्यालय
स्विस महासंघाच्या अध्यक्षांसोबत पंतप्रधानांची बैठक
प्रविष्टि तिथि:
01 DEC 2023 8:01PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 डिसेंबर 2023 रोजी दुबईत कॉप-28 परिषदेच्या निमित्ताने स्विस महासंघाचे अध्यक्ष अलेन बर्सेट यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली.
बैठकीदरम्यान, उभय नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान , पर्यटन आणि लोकांचे परस्पर संबंध यासह भागीदारी आणखी दृढ करण्याच्या उपायांवर चर्चा केली.
परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा झाली.
भारताचे जी 20 अध्यक्षपद आणि शिखर परिषदेच्या यशाबद्दल अध्यक्ष बर्सेट यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले.
***
S.Patil/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1981778)
आगंतुक पटल : 161
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam