पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त देशवासियांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
27 NOV 2023 11:27AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गुरु नानक देव जी यांनी इतरांची सेवा आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्यावर दिलेला भर जगभरातील कोट्यवधी लोकांना सामर्थ्य प्रदान करतो असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या कालच्या मन की बात या कार्यक्रमात श्री गुरु नानक देव जी यांना नमन केल्याची व्हिडिओ क्लिप देखील सामायिक केली आहे.
"श्री गुरु नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त शुभेच्छा. श्री गुरु नानक देव जी यांनी इतरांची सेवा आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्यावर दिलेला भर जगभरातील कोट्यवधी लोकांना सामर्थ्य प्रदान करतो. कालच्या मन की बात मध्ये देखील त्यांना आदरांजली वाहिली आहे"
असे पंतप्रधानांनी एक्स वर दिलेल्या संदेशात म्हटले आहे.
S.Kane/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1980097)
आगंतुक पटल : 154
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam