माहिती आणि प्रसारण मंत्रालय

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्वच्छता आणि प्रलंबित प्रकरणांची निपटारा या संदर्भात सुरू असलेली विशेष मोहीम 3.0 यशस्वीरित्या केली पूर्ण


2 लाख किलो भंगाराची विल्हेवाट लावली, त्यातून 3.62 कोटी कोटी रुपयाचे उत्पन्न

1000 हून अधिक परिसर मोहिमांचे आयोजन तर 1900 हून अधिक ठिकाणे निश्चित करुन तिथे केली स्वच्छता

सार्वजनिक तक्रारी आणि सार्वजनिक तक्रार अपील निकाली काढण्याचे उद्दिष्ट केले पूर्ण

Posted On: 14 NOV 2023 3:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छतेला संस्थात्मक रूप देण्याच्या आणि सरकारी कार्यालयामधील प्रलंबितता कमी करण्याच्या दृष्टीकोनातून प्रेरित होऊन, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयांसह 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यावर लक्ष केंद्रित करून विशेष मोहीम 3.0 मध्ये भाग घेतला. या मोहिमेत स्वच्छता संस्थात्मक करणे, प्रलंबिततेची निपटारा करणे, योग्य जागा व्यवस्थापन आणि संवादाच्या विविध माध्यमांतून जागरूकता निर्माण करणे या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

या उपक्रमात एकूण 1013 परिसर मोहिमा राबविण्यात आल्या. 1972 ठिकाणे निश्चित करुन तिथे स्वच्छता करण्यात आली. 2,01,729 किलो भंगाराची विल्हेवाट लावली यामुळे 29, 670 चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली आणि त्यातून 3.62 कोटी रुपये देखील कमावले आहेत. या मोहिमेत 49,984 फायलींचे पुनरावलोकन केले गेले, त्यापैकी 28,574 फायली निकाली काढण्यात आल्या. 841 ई-फाईल्सही निकाली काढण्यात आल्या. विशेष मोहीम 3.0 दरम्यानच्या कामगिरीवर 1837 समाज माध्यम पोस्ट प्रकाशित करण्यात आल्या. मंत्रालयाने सार्वजनिक तक्रारी, सार्वजनिक तक्रार अपील निकाली काढण्याचे 100% लक्ष्य गाठले आहे. त्यासोबतच 21 खासदार संदर्भ, 2 पंतप्रधान कार्यालय संदर्भ आणि 7 संसदीय आश्वासने निकाली काढली आहेत. एका समर्पित चमूद्वारे मोहीमेच्या दैनंदिन प्रगतीचे परीक्षण केले गेले आणि ही माहिती प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाद्वारे कार्यान्वीत केलेल्या SCPDM पोर्टलवर ही माहिती अपलोड करण्यात आली. मोहिमेदरम्यान मंत्रालयाने अनेक सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब केला. काही महत्त्वाच्या सर्वोत्तम पद्धती पुढील प्रमाणे आहेत:

1) स्टोअर रूमचे मनोरंजन केंद्रात रूपांतर

2) तलावाच्या पाण्याची स्वच्छता

3) टाकाऊपासून टिकाऊ उपक्रम

4) कचरा साठवला जाणऱ्या जागेचे सुशोभीकरण

5) भंगार ठेवलेल्या कक्षाचे योग केंद्रात रूपांतर

मंत्रालयाचे सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देऊन स्वच्छता मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि मागील मोहिमेदरम्यान मोकळ्या केलेल्या जागेच्या वापराचा आढावा घेतला.

मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी विशेष मोहीम 3.0 दरम्यान बेंगळुरू येथील मंत्रालयाच्या क्षेत्रीय कार्यालयांना भेट दिली

सर्वोत्तम पद्धती 1: स्टोअर रूमचे मनोरंजन केंद्रात रूपांतर

विशेष मोहीम 3.0 दरम्यान, मंत्रालयाने शास्त्री भवनच्या तळमजल्यावर स्थित

मुख्य सचिवालयाच्या एका स्टोअर रूमचे जिम आणि टेबल टेनिस सुविधेसह एका वेगळ्या मनोरंजन केंद्रात रूपांतर केले आहे.

सर्वोत्तम पद्धती 2: तलावाच्या पाण्याची स्वच्छता

सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (SRFTI) कोलकाता यांनी संस्थेच्या परिसरातील 60,000 स्क्वेअर फूट आकाराच्या तलावाची सर्वसमावेशक स्वच्छता हाती घेतली. यामुळे पाण्याखालील परिसंस्थेचे रक्षण करण्यात तसेच मासे आणि नारळाच्या झाडांच्या वाढीस चालना मिळाली आहे. पुनरुज्जीवित झालेला तलाव आता मत्स्यपालन आणि नारळाची लागवड, पाणी आणि वृक्ष स्वच्छता राखून निविदांद्वारे महसूल मिळवून देण्याचा दुहेरी उद्देश पूर्ण करत आहे.

सर्वोत्तम पद्धती 3 : टाकाऊपासून टिकाऊ उपक्रम

शाश्वततेच्या क्षेत्रात, SRFTI ने तीन टप्प्यात "टाकाऊपासून टिकाऊ" उपक्रम राबविला. सुरुवातीला, विद्यार्थ्यांच्या एका गटाने परिसरामध्ये टाकून दिलेले भंगार गोळा करून त्याचे चित्रीकरणाच्या उद्देशाने वापरल्या जाणार्‍या कलात्मक वस्तूमध्ये रूपांतरण केले. त्यानंतर, गोळा केलेल्या भंगारावर चित्रीकरणाच्या ठिकाणी प्रक्रिया करण्यात आली, आणि ते भंगार टेबल, बाक आणि सर्कसमधील वस्तू आणि यांसारख्या नाविन्यपूर्ण आणि वापरण्यायोग्य उत्पादनांमध्ये रूपांतरित केले गेले. शेवटी, चित्रपट संचाचा अविभाज्य घटक म्हणून या वस्तूंचा वापर करून मोहीमेचा उद्देश सफल करण्यात आला, परिणामी 30,000 रुपयांची बचत झाली आणि या वस्तू सर्व विद्यार्थ्यांना वापरासाठी उपलब्ध झाल्या.

सर्वोत्तम पद्धती 4: कचरा साठवला जाणऱ्या जागेचे सुशोभीकरण

सुशोभित करण्याच्या आणि जागरूकता निर्माण करण्याच्या प्रयत्नात, SRFTI ने नव्याने बांधलेल्या कचरा क्षेत्राला विविध चित्र, प्रेरणादायी वाक्ये आणि फुलांच्या रोपांनी सुशोभित केले.

सर्वोत्तम पद्धती 5: भंगार ठेवलेल्या कक्षाचे योग केंद्रात रूपांतर

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (IIMC) ने मोहिमेदरम्यान निरुपयोगी वस्तू ठेवण्यासाठीची जागा म्हणून वापरली जात असलेला एक मोठ कक्ष निश्चित करुन त्याची स्वच्छता केल्याने आता ती जागा नैसर्गिक प्रकाशाने योग्य प्रकाशित आणि चैतन्यदायी बनली आहे. भंगाराची विल्हेवाट आणि साफसफाई केल्यानंतर या कक्षाचे योग कक्षात रूपांतर करण्यात आले असून योगासनासाठी प्राध्यापकांना तसेच विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे.

स्वच्छता केलेल्या ठिकाणांची काही छायाचित्रे

दूरदर्शन केंद्र, कोलकाता

स्वच्छतेपूर्वी स्वच्छतेनंतर

आकाशवाणी लेह

आकाशवाणी इंफाळ

आकाशवाणी आगरतळा

दूरदर्शन केंद्र भुवनेश्वर (DD ODIA)

 

G.Chippalkatti/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1976872) Visitor Counter : 76