पंतप्रधान कार्यालय
आयुर्वेदाला पाठबळ देणे हे व्होकल फॉर लोकल असण्याचे एक ज्वलंत उदाहरण आहे: पंतप्रधान
आयुर्वेद दिनानिमित्त नवोन्मेषक आणि अभ्यासकांना केला सलाम
Posted On:
10 NOV 2023 6:31PM by PIB Mumbai
आयुर्वेदाला पाठबळ देणे हे व्होकल फॉर लोकल असण्याचे एक ज्वलंत उदाहरण आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या प्राचीन ज्ञानाची आधुनिकतेशी सांगड घालणाऱ्या आणि आयुर्वेदाला जागतिक स्तरावर नव्या उंचीवर नेणाऱ्या नवोन्मेषक आणि अभ्यासकांचेही मोदी यांनी कौतुक केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
''धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर आपण आयुर्वेद दिन देखील साजरा करतो. या प्राचीन ज्ञानाची आधुनिकतेशी सांगड घालणार्या, आयुर्वेदाला जागतिक स्तरावर नवीन उंचीवर नेणार्या नवोन्मेषकांना आणि अभ्यासकांना मानवंदना देण्याचा हा दिवस आहे. अनोख्या संशोधनांपासून सर्जनशील स्टार्टअप्सपर्यंत, आयुर्वेद निरामयतेचे नवीन मार्ग खुले करत आहे. आयुर्वेदाला पाठबळ देणे हे व्होकल फॉर लोकल असण्याचे एक ज्वलंत उदाहरण आहे''
***
S.Kane/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1976269)
Visitor Counter : 133
Read this release in:
Tamil
,
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Malayalam