पंतप्रधान कार्यालय
संत मीराबाई यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी देशबांधवांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
28 OCT 2023 6:32PM by PIB Mumbai
संत मीराबाई यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधानांनी संत मीराबाईंना ‘भगवान कृष्णाच्या अतुलनीय भक्त’ असे संबोधले आहे. मीराबाईंची भजने प्रत्येक घरात गायली जात असून मीराबाईंचे जीवन समाजासाठी प्रेरणादायी असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे,
"भगवान श्रीकृष्णाच्या निस्सीम भक्त मीराबाई यांचे जीवन आपल्या समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांची भजने आणि दोहे आजही प्रत्येक घरात आदराने आणि भक्तीने गायली जातात. मीराबाईंच्या जयंतीनिमित्त देशभरातील माझ्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा."
***
M.Pange/S.MukhedarP.Kor
Follow us on social media:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1972635)
Visitor Counter : 121
Read this release in:
Kannada
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam