Posted On:
26 OCT 2023 4:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2023
चीनमधील हांगझोऊ येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 100 मीटर-टी37 प्रकारच्या स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रेयांश त्रिवेदी याचे अभिनंदन केले आहे.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“पुरुषांच्या 100 मीटर-टी37 प्रकारच्या स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल श्रेयांश त्रिवेदी याचे हार्दिक अभिनंदन. ही एक अत्यंत विलक्षण कामगिरी आहे!
यापुढे देखील त्याने नवनवी क्षितिजे गाठण्याच्या दिशेने धाव घ्यावी.”
S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai