पंतप्रधान कार्यालय
आशियाई पॅरा क्रीडास्पर्धेत तिरंदाजीमध्ये रौप्यपदक जिंकल्याबद्दल राकेश कुमार आणि सूरज सिंग या जोडीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
25 OCT 2023 10:08PM by PIB Mumbai
हांगझोऊ इथे सुरु असलेल्या आशियाई पॅरा क्रीडास्पर्धेत तिरंदाजीमध्ये रौप्यपदक पटकावल्या बद्दल राकेश कुमार आणि सूरज सिंग यांच्या सांघिक खेळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कौतुक केले.
ही जोडी जबरदस्त असून त्यांच्या कामगिरीने देशाची मान अभिमानाने उंचावली असल्याचे ते म्हणाले.
एक्स वरिल आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले:
"पुरुष दुहेरी कंपाऊंड - खुल्या स्पर्धेत पॅरा तिरंदाजीमध्ये रौप्यपदक जिंकल्याबद्दल, राकेश कुमार आणि सूरज सिंग या जबरदस्त जोडीचे अभिनंदन. त्यांच्या अद्वितीय सांघिक खेळ आणि अचूकतेने भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यांना शुभेच्छा."
***
SonalT/VinayakGDY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1971308)
आगंतुक पटल : 121
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada