पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी उपराष्ट्रपती भैरोसिंग शेखावत यांना त्यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
Posted On:
23 OCT 2023 4:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी उपराष्ट्रपती भैरोसिंग शेखावत यांना त्यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. भारताच्या लोकशाही जडणघडणीला अधिक समृद्ध करण्यात भैरोसिंगजी यांनी अत्यंत महत्वाची भूमिका निभावली तसेच संसदेतील वादविवाद आणि चर्चेच्या मानकांना पुढे नेण्याच्या वचनबद्धतेसाठी त्यांचा कार्यकाळ चिरकाल स्मरणात राहील, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी माजी उपराष्ट्रपतींसमवेत त्यांची काही छायाचित्रे सामायिक केली आहेत.
पंतप्रधानांनी एक्स पोस्ट वर म्हटले आहे,
“आजचा दिवस अतिशय विशेष आहे - आदरणीय राजकीय नेते भैरोसिंग शेखावत जी यांची आज 100 वी जयंती आहे. आपल्या देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांच्या नेतृत्वाविषयी भारत नेहमीच त्यांचा कृतज्ञ राहील. ते एक असे व्यक्तिमत्व होते जे संपूर्ण राजकीय पटलावर आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर सर्वाना अतिशय प्रिय होते.
माझ्या आणि त्यांच्यातील संवादाची एक झलक देखील येथे देत आहे.
“भैरोसिंगजी एक दूरदर्शी नेते आणि प्रभावी प्रशासक होते. एक उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि राजस्थानला प्रगतीच्या एका वेगळ्या उंचीवर नेले. राजस्थानमधील गोरगरीब, शेतकरी, युवक आणि महिलांसाठी उत्तम दर्जाचे जीवनमान सुनिश्चित करण्यावर त्यांचा भर होता. ग्रामीण भागाची प्रगती करण्याच्या हेतूने त्यांनी कित्येक उपक्रम सुरु केले.
उपराष्ट्रपती म्हणून भारताच्या लोकशाही जडणघडणीला अधिक समृद्ध करण्यात भैरोसिंगजी यांनी अत्यंत महत्वाची भूमिका निभावली. संसदेतील वादविवाद आणि चर्चेच्या मानकांना पुढे नेण्याच्या वचनबद्धतेसाठी त्यांचा कार्यकाळ चिरकाल स्मरणात राहील. त्यांचे कौशल्य आणि विनोदबुद्धीही तितक्याच आनंदाने लक्षात राहते.
भैरोसिंगजी यांच्याबरोबर घालवलेल्या क्षणांच्या अगणित आठवणी माझ्याकडे आहेत. ज्यावेळी मी पक्ष संघटनेसाठी कार्य करता होतो आणि 1990 मध्ये एकता यात्रेदरम्यानच्या काही आठवणी आहेत. ज्या ज्या वेळी मी त्यांना भेटत असे तेव्हा तेव्हा जलसंवर्धन, गरिबी निर्मूलन आणि अशा अनेक विषयांवरील विविध पैलूंबद्दल खूप काही शिकत असे.
2001 मध्ये मी गुजरातचा मुख्यमंत्री झालो आणि एक वर्षानंतर भैरोसिंगजी भारताचे उपराष्ट्रपती झाले. त्या काळात त्यांचा सातत्यपूर्ण पाठिंबा मिळण्याचे भाग्य मला लाभले. 2005 च्या व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता त्यावेळी त्यांनी गुजरातमध्ये आम्ही करत असलेल्या कामाची प्रशंसा केली होती.
त्यांनी माझ्याद्वारे लिहिलेल्या 'आँख आ धन्य चे' या पुस्तकाचे प्रकाशनही केले होते. त्या कार्यक्रमातील एक चित्र येथे आहे.
भैरोसिंगजी यांच्या राष्ट्राप्रती असलेल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आणि प्रत्येक भारतीयाला सन्मानाचे जीवन जगता यावे तसेच भारताच्या विकासाला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी आणि समृद्ध करण्यासाठी अनेक संधी प्राप्त होवोत हे सुनिश्चित करण्यासाठी आज आपण आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करूया."
* * *
S.Tupe/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1970068)
Visitor Counter : 126
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam