सहकार मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह सोमवार, 23ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे नॅशनल कोऑपरेटिव्ह फॉर एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) द्वारे आयोजित ‘सहकारी निर्यात ’ यावरील  परिसंवादाला करणार  संबोधित

Posted On: 22 OCT 2023 1:52PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह सोमवार, 23 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे नॅशनल कोऑपरेटिव्ह फॉर एक्सपोर्ट्स लिमिटेड (एनसीईएल) द्वारे आयोजित सहकारी निर्यातीवरील राष्ट्रीय परिसंवादाला संबोधित करतील. अमित शाह एनसीईएलचे बोधचिह्न, संकेतस्थळ आणि माहितीपत्रकही जारी करतील आणि एनसीईएल सदस्यांना सदस्यत्व प्रमाणपत्रांचे वितरण करतील. या परिसंवादात सहकारी संस्थांना निर्यात बाजारांशी जोडण्याच्या दृष्टीने  त्यांना मार्गदर्शन, भारतीय कृषी-निर्यातीच्या क्षमता आणि सहकारी संस्थांना उपलब्ध असलेल्या संधी यांसह विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाईल.

नॅशनल कोऑपरेटिव्ह फॉर एक्सपोर्ट्स लिमिटेड ही 25 जानेवारी 2023 रोजी, बहु-राज्य सहकारी संस्था अधिनियम, 2002 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी क्षेत्रातील निर्यातीसाठी नव्याने स्थापन झालेली व्यापक संस्था आहे. या संस्थेच्या कार्यक्षेत्रात कृषी आणि कृषिसंबद्ध क्रियाकलाप तसेच हातमाग आणि हस्तकला वस्तूंचा समावेश होतो. या संस्थेच्या अंतर्गत 2025 पर्यंत मोठ्या प्रमाणात सहकारी संस्थांची नोंदणी करून महसूल सध्याच्या 2,160 कोटी रुपयांच्या स्तरावरून दुप्पट करण्याचे तिचे उद्दिष्ट आहे.

***

S.Kane/S.Auti/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1969905) Visitor Counter : 96