पंतप्रधान कार्यालय
केरळचे माजी मुख्यमंत्री अच्युतानंदन यांना 100 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
20 OCT 2023 10:02PM by PIB Mumbai
केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही.एस. अच्युतानंदन यांना आज त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
केरळच्या लोकांची अनेक दशके सेवा केल्याबद्दल अच्युतानंदन यांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली आणि त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही.एस. अच्युतानंदन जी यांना त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. ते अनेक दशकांपासून केरळच्या लोकांसाठी काम करत आहेत. मला त्यांच्याशी झालेला संवाद, विशेषत: जेव्हा आम्ही दोघे आपापल्या राज्यांचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना झालेला संवाद आठवतो. त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो."
***
G.Chippalkatti/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1969603)
आगंतुक पटल : 162
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam