पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गाझामधील अल अहली रुग्णालयात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले

Posted On: 18 OCT 2023 2:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 ऑक्‍टोबर 2023

 

गाझामधील अल अहली रुग्णालयातील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना केली आहे.

पंतप्रधानांनी X समाजमाध्यमावर म्हटले आहे:

“गाझामधील अल अहली रुग्णालयात झालेली जीवितहानी धक्कादायक आहे. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना.”

सध्या सुरू असलेल्या संघर्षामधील सर्वसामान्य नागरिकांची जीवितहानी ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे. संबंधितांना जबाबदार धरायला हवे.”

“गाझामधील अल अहली रुग्णालयात झालेली जीवितहानी धक्कादायक आहे. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना.”

सध्या सुरू असलेल्या संघर्षामधील सर्वसामान्य नागरिकांची जीवितहानी ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे...

— नरेंद्र मोदी (@narendramodi) October 18, 2023

 

* * *

R.Aghor/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1968708) Visitor Counter : 128