पंतप्रधान कार्यालय
छत्रपती संभाजीनगर येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रधानमंत्री मदत निधी मधून मदत जाहीर
प्रविष्टि तिथि:
15 OCT 2023 9:31AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी कामनाही पंतप्रधानांनी केली आहे.
पंतप्रधानांनी, प्रधानमंत्री मदत निधी मधून (PMNRF) प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले;
“छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या अपघातातील जीवितहानीमुळे दु:ख झाले. या अपघातात ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी कामना करतो. प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री मदत निधी मधून (PMNRF) 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल PM@narendramodi”
***
MI/VPY/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1967844)
आगंतुक पटल : 163
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam