गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी गांधीनगर या आपल्या लोकसभा मतदार संघातील अंगणवाडी केंद्रातील लहान मुलांना गेमिंग झोनची घडवली सफर


मुलांचा आनंद आणि उत्साह पाहून मी अतिशय भारावून गेलो

Posted On: 14 OCT 2023 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑक्‍टोबर 2023  

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज त्यांच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातील अंगणवाडी केंद्रातील मुलांना गेमिंग झोनची सफर घडवली.

'एक्स' वरील आपल्या पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले.

"आज माझ्या मतदारसंघातील अंगणवाडी केंद्रातील मुलांना गेमिंग झोन मध्ये घेऊन गेलो. मुलांनी त्यांचे आवडते खेळ खेळण्यात खूप आनंद लुटला."

"एक खासदार म्हणून माझ्या लोकसभा मतदार संघातील अंगणवाडी केंद्रातील बालकांना श्रीमंत कुटुंबातील मुलांना मिळणाऱ्या सर्व सुविधा आणि आनंद मिळावा यासाठी माझा प्रयत्न आहे, यासाठी त्यांना उत्तम शिक्षण, पोषक आहार यांसह खेळण्यांचे वाटप आणि गेमिंग झोन मध्ये करमणूक मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. मुलांचा हा आनंद आणि उत्साह पाहून मी खूप भारावून गेलो आहे, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले."

* * *

S.Kane/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1967726) Visitor Counter : 78