पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या हस्ते 13 ऑक्टोबर रोजी 9व्या जी -20 संसदीय अध्यक्ष शिखर परिषदेचे (पी 20) उदघाटन

Posted On: 12 OCT 2023 11:23AM by PIB Mumbai

नवी दिल्लीत  यशोभूमी  येथे  13 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता  पंतप्रधान नरेंद्र मोदी  9व्या जी -20 संसदीय अध्यक्ष शिखर परिषदेचे उदघाटन करणार आहेत. भारताच्या जी- 20 अध्यक्षतेच्या  व्यापक रुपरेषेअंतर्गत भारताच्या  संसदेद्वारे ही शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे.
भारताच्या जी -20 अध्यक्षतेच्या संकल्पनेच्या अनुषंगाने, 9व्या पी- 20 शिखर परिषदेची संकल्पना  "एक पृथ्वी, एक कुटुंब, एक  भविष्यासाठी संसद" ही आहे.या कार्यक्रमाला जी- 20 सदस्य आणि आमंत्रित देशांच्या संसदेचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. 9-10 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्लीत  जी 20 प्रमुख नेत्यांच्या शिखर परिषदेमध्ये  आफ्रिकन युनियन जी- 20 चा सदस्य झाल्यानंतर संपूर्ण -आफ्रिकन संसद प्रथमच पी -20 शिखर परिषदेत सह्भाग घेणार आहे.
सार्वजनिक डिजिटल मंचाद्वारे  लोकांच्या जीवनात परिवर्तन; महिलांच्या नेतृत्वाखालील विकास; शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेला  गती देणे आणि   शाश्वत ऊर्जा संक्रमण या चार मुख्य विषयांवर पी -20 शिखर परिषदेत प्रामुख्याने भर दिला जाईल.
निसर्गाशी सुसंगत हरित आणि शाश्वत भविष्यासाठी पुढाकार घेण्याच्या दृष्टीने 12 ऑक्टोबर 2023 रोजी लाईफ (LiFE ) (पर्यावरणस्नेही जीवनशैली ) यावर आधारित  एक  संसदीय मंच  देखील  परिषदेच्या पूर्वी  आयोजित केला जाईल.

***

NM/SonalChavan/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1966942) Visitor Counter : 147